Uncategorized

बोईसर व पालघरला थांबा देण्याची मागणीखासदार डॉ. हेमंत सवरा यांचे पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना निवेदन

बोईसर व पालघरला थांबा देण्याची मागणी
खासदार डॉ. हेमंत सवरा यांचे पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना निवेदन
पालघर | प्रतिनिधी
बांद्रा–गाझीपूर एक्सप्रेस (गाडी क्रमांक 20941/20942) ही गाडी दररोज सुरू करावी तसेच बोईसर व पालघर रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात यावा, अशी मागणी पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. विवेक कुमार गुप्ता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी पाठविण्यात आलेल्या या निवेदनात खासदार सवरा यांनी नमूद केले आहे की, पालघर लोकसभा मतदारसंघातील बोईसर व पालघर परिसरातील नागरिकांकडून सदर गाडी दररोज चालवावी व थांबे द्यावेत, अशी दीर्घकालीन मागणी होत आहे. बोईसर व पालघर हे औद्योगिक, शैक्षणिक आणि वेगाने विकसित होत असलेले भाग असून, येथून उत्तर प्रदेश व आसपासच्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवासी प्रवास करतात.
सध्या सदर गाडीची मर्यादित फेरी आणि बोईसर व पालघर येथे थांबा नसल्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे ही गाडी दररोज चालविणे आणि दोन्ही स्थानकांवर थांबा देणे हे सार्वजनिक हिताचे ठरेल, असे मत खासदार सवरा यांनी व्यक्त केले आहे.
या मागणीमुळे बोईसर व पालघर परिसरातील कामगार, विद्यार्थी, व्यापारी व सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, पश्चिम रेल्वेने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button