आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्र गोंदे बु. येथे आरोग्यमंत्री यांचे OSD डॉ. आडकेकर यांची पाहणी.

आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्र गोंदे बु. येथे आरोग्यमंत्री यांचे OSD डॉ. आडकेकर यांची पाहणी
पालघर (प्रतिनिधी):
पालघर जिल्ह्यात सिकलसेल आजार निर्मूलनासाठी राबविण्यात येत असलेल्या अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान याच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश अबीटकर यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) मा. डॉ. आडकेकर यांनी मो–हांडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्र, गोंदे बु. येथे पाहणी भेट दिली.
या पाहणीदरम्यान अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंके, मोखाडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चत्तर तसेच संबंधित अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. आडकेकर यांनी अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानासह विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेत उपकेंद्रातील कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच ० ते ४० वर्ष वयोगटातील प्रत्येक नागरिकाची सिकलसेल ॲनिमियाची तपासणी सुनिश्चित करण्याच्या सूचना देत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी देण्यात आलेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यात आतापर्यंत अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानांतर्गत २ लाख ३३ हजार ३९० नागरिकांची सिकलसेल तपासणी करण्यात आली आहे. तपासणीमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचे नमुने BPHU व HLL संस्थांमार्फत तपासून अचूक निदान करण्यात येत आहे. तसेच संबंधित रुग्णांना सिकलसेल कार्ड वितरित करून आवश्यक औषधोपचार व उपचार सेवा नियमितपणे उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
ही पाहणी जिल्ह्यातील सिकलसेल निर्मूलन मोहिम अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली आहे.