Uncategorized

आदिवासींना न्याय मागण्यासाठी लाल बावटा पक्षाचा रणरणत्या उन्हात २३ किलोमीटर लॉंग मार्च तहसीलदार कार्यालयांवर धडक,प्रशासनासोबत जबरदस्त संघर्ष

आदिवासींना न्याय मागण्यासाठी लाल बावटा पक्षाचा रणरणत्या उन्हात २३ किलोमीटर लॉंग मार्च तहसीलदार कार्यालयांवर धडक,प्रशासनासोबत जबरदस्त संघर्ष

मनोर /प्रसाद भालेराव
शिमग्याचा सण अक्षरशः उलटूनही रोजगार हमी योजनेवर काम केलेल्या पालघर जिल्ह्यातील ८ तालुक्यातील मजुरांची तब्बल ५२ कोटी ५४ लाख रुपयांची मजुरी मागील काही महिन्यांपासून शासनदरबारी प्रलंबित आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांवर ऐन सणासुदीला उपासमारीची वेळ आली आहे. सन २०२२ पासून दरवर्षी सणासुदीच्या काळातच मजुरांना हक्काच्या पैशांपासून वंचित राहावे लागत आहे.
राज्यातील ३४ जिल्ह्यांपैकी पालघर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बीड व भंडारा या ७ आदिवासी बहुल व मागासलेल्या जिल्ह्यांमध्येही पालघरसारखी स्थिती आहे. भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी लाल बावटा पक्ष पालघर जिल्ह्यातील मजुरांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. कामगारांची मजूरी तातडीने खात्यात जमा करा. मजुरांना १५ दिवसांच्या आत मजुरी प्राप्त होण्याचा अधिकार असताना १५ दिवसाच्या आत मजुरी प्राप्त न झाल्यास हजेरीपत्रक बंद केल्यास १६व्या दिवसानंतरही विलंब झाल्यास प्रतिदिन वेतनाच्या ०.०५ टक्के दराने विलंब आकार मिळण्याचा अधिकार आहे. मात्र मूळ पगारच ३ ते ४ महिन्यांपासून थकीत असल्याने शासनाने मूळ पगार आणि त्यावर ०.०५ टक्के दराने विलंब आकारही अदा करावा, अशी मागणी पक्षाचे जिल्हा सह सेक्रेटरी काॅम्रेड.शेरू वाघ यांनी केली आहे. ह्या मोर्चा दरम्यान केली आहे.
शिक्षण, रोजगा, घरकुल, पाणी, वनपट्टे, रस्ते, आरोग्य सेवा, जलजिवन योजनेत भ्रष्टाचार, रोजगार हमीत भ्रष्टाचार, विविध प्रकल्पात संपादित झालेल्या शेतकर्यांना योग्य मोबदला, गवत पावलीला योग्य दर, बांधकाम कामगार नोंदणी, प्रतेकाला रेशनकार्ड वर ३५ किलो अंत्योदय धान्य मिळावे ईत्यादी सामान्य जनतेच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नांवर आवाज उठवित मंगळावरी दि. १० मार्च रोजी मस्तान नाका येथून हजारोंच्या संख्येने शिमगा मोर्चा काढत रणरणत्या उन्हात तब्बल २३ किलोमीटर पायी चालत आपल्या मागण्या सरकार पुढे मांडल्या ह्या दरम्यान मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ह्या आंदोलनात बैलगाडी घेऊन मोठ्या संख्येने महिला वयोवृद्ध लोक शामिल झाले होते. हा मोर्चा जेव्हा तहसीलदार कार्यालयांवर पोचल्या नंतर महिला आंदोलक आक्रमक झाल्या ह्या दरम्यान पोलिसांनी हा मोर्चा तहसीलदार कचेरीचे गेट वर अडवला थोडा वेळ पोलीस आणी महिला आंदोलनककर्त्यान मध्ये संघर्ष पाहायला मिळाला. तहसीलदार, गटविकास अधिकारी सह मागण्याशी सर्व संबंधित अधिकारी बाहेर येऊन चर्चा केली. तब्बल ६ तास चर्चा चालल्यानंतर काही प्रश्न सोडवीण्यात आले तर काही प्रश्नावर येत्या २३ तारखेपर्यंत प्रश्न सोडविण्यासाठी आश्वासन दिले आहे. ह्या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे जिल्हा सह सेक्रेटरी काॅम्रेड. शेरू वाघ,विक्रमगड तालुका सेक्रेटरी काॅम्रेड. काशिनाथ कोकेरा,काॅम्रेड प्रकाश भोये, अखिल भारतीय किसन संघटनेच्या तालुका अध्यक्ष काॅम्रेड दिनेश भेकरे सह तालुका कमिटीने केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button