Uncategorized

अमित ठाकरेंच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण.
चार महीने पासून प्रलंबित आज करण्यात आले.

अमित ठाकरेंच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण.
चार महीने पासून प्रलंबित आज करण्यात आले.

दिनांक: १६ नोव्हेंबर २०२५
मुंबई प्रतिनीधी : (सतिश पाटील)
अमित ठाकरेंच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
प्रशासनाकडून उद्‍घाटनाबाबत सुरू होती चालढकल
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १६ : मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते अनौपचारिकरीत्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. नवी मुंबई महापालिकेतर्फे नेरूळ येथे मध्यवर्ती ठिकाणी शिवसृष्टी उभारण्यात आली आहे, मात्र मंत्र्यांची वेळ महापालिका प्रशासनाला मिळत नसल्यामुळे पुतळ्याचे अनावरण होत नव्हते. याबाबत अनेकवेळा महापालिका प्रशासनाकडे लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती. रविवारी नवी मुंबईच्या दौऱ्यावर आलेल्या अमित ठाकरे यांनी मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांच्यासहीत शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन शिवसृष्टीचे अनावरण केले.
अमित ठाकरे हे रविवारी नवी मुंबई दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात दिघा, कोपरखैरणे या भागातील मनसे शाखेवर जाऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर नेरूळ स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन ते थेट नेरूळ येथे महापालिकेने तयार केलेल्या शिवसृष्टीवर पोहोचले. या वेळी पोलिस आणि महापालिका प्रशासनाला कोणतीही पूर्व कल्पना न देता थेट मनसे पदाधिकाऱ्यांसोबत जाऊन ताडपत्रीने झाकलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अमित ठाकरे यांनी उघडला. तसेच तयार केलेल्या मेघडंबरीत स्वच्छता करून पुतळ्याचे अनावरण केले. याप्रसंगी स्थानिक पोलिसांनी धाव घेत मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी काही स्थानिक ग्रामस्थांनी मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांच्यासोबत हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. शिवसृष्टीचे उद्‍घाटन करणार होते, तर सामान्य जनतेला विश्वासात का घेतले नाही, असे या नागरिकांचे म्हणणे होते, मात्र या वेळी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये अधिक वाद होऊ नये याकरिता पोलिसांनी वेळीच मध्यस्थी

मी नवी मुंबईच्या दौऱ्यावर आलो होतो. तेव्हा मला समजले, की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महापालिकेने तयार केला आहे, मात्र मंत्र्यांना वेळ मिळत नसल्यामुळे महाराजांच्या शिवसृष्टीचे उद्‍घाटन होत नसल्याचे समजले. त्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांसह आज जाऊन उद्‍घाटन केले आहे. माझ्यावर महाराजांसाठी पहिला राजकीय गुन्हा दाखल करून घ्यायला मला काही हरकत नाही.
अमित ठाकरे, मनसे नेते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button