दुसखेडा येथील शेतकरी राजेंद्र पाटील यांची चोरी झालेली ५५,००० रू किंमतीची मोटर मिळून आली.


दुसखेडा येथील शेतकरी राजेंद्र पाटील यांची चोरी झालेली ५५,००० रू किंमतीची मोटर मिळून आली.
प्रतिनिधी / विशाल दांडगे
यावल: ७ फेब्रुवारी २०२६
दुसखेडा: येथील शेतकरी राजेंद्र लक्ष्मण पाटील यांची ५५,००० रू. किंमतीची १२.५ हॉस पॉवरची मोटर चोरांनी १ फेब्रुवारी च्या मध्यरात्री अज्ञात चोरांनी चोरून नेली होती.
२ तारखेच्या सकाळी राजेंद्र पाटील हे नदी वरती मोटर चालू करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी मोटर आढळून आली नाही व वायर कट झालेली दिसली तात्काळ त्यांनी पोलीस पाटील सौ.संगिता विशाल दांडगे यांच्याशी संपर्क केला. पोलीस पाटील यांनी लगेचच फैजपूर पोलीस स्टेशन येथे कळविण्यात आले व राजेंद्र पाटील यांना फिर्याद देण्यासाठी फैजपूर पोलीस स्टेशन येथे तात्काळ पाठवण्यात आले.फिर्याद देऊन साधारण: ४ ते ५ दिवस झाले असता. ती मोटर दि ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास नदीवरील मच्छीमार मच्छी पकडण्यासाठी गेले असता त्यांना ती मोटार आढळून आली लगेच त्यांनी पोलीस पाटील संगीता दांडगे यांच्याशी संपर्क केला.पोलीस पाटील यांनी नदीवर जाऊन चौकशी केली. असता चोरांनी साधारणतः ३०० ते ४०० मीटर लांब ठिकाणी पाण्यात मोटर लपवलेली होती.लगेच
मूळ मालक राजेंद्र पाटील यांना नदी वरती बोलवून गावातील राजू सोनवणे व संदीप गोसावी या तरुणांच्या मदतीने ती मोटर पाण्यातून बाहेर काढण्यात आली व ती मूळ मालक यांना सुपूर्द करण्यात आली.