तलासरी जि. पालघर येथे चर्च ऑफ गॉड वर्ल्ड मिशन सोसायटी व्दारे, ९११४ वी जागतिक पर्यावरण स्वच्छता मोहीम संपन्न


तलासरी जि. पालघर येथे चर्च ऑफ गॉड वर्ल्ड मिशन सोसायटी व्दारे, ९११४ वी जागतिक पर्यावरण स्वच्छता मोहीम संपन्न
१२ डिसेंबर
पालघर ( एच लोखंंडे ) गुरुवार, ११ डिसेंबर २०२५ रोजी, वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडने महाराष्ट्रातील राज्यातील तलासरी जि. पालघर या शहरातील तलासरी नगर पंचायत कार्यालयाभोवती “९११४ वी जागतिक पर्यावरण स्वच्छता मोहीम” आयोजित करून संपन्न करण्यात आली. यावेळी वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडचे जनरल पास्टर किम जू-चेओल यांच्या नेतृत्वाखाली, संस्थेच्या सुमारे १५० सदस्यांनी स्वच्छता मोहिमेत भाग घेतला, सकाळी १०:३० ते दुपारी १ वाजेपर्यंत तलासरी नगर पंचायतीपासून. ते गोदावरी कॉलेजच्या परिसरात स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेदरम्यान एकूण ४० पिशव्या, म्हणजेच अंदाजे ४०० किलो कचरा संकलन करण्यात आला.
चर्च ऑफ गॉड वर्ल्ड मिशन सोसायटीने आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेत प्रमुख पाहुणे म्हणून ,तलासरी नगराध्यक्ष श्री. सुरेश भोये, तलासरी पोलिस निरीक्षक श्री. अजय गोराड आणि तलासरी आरोग्य विभाग पंचायत समितीचे डॉ. श्रीकांत कुलकर्णी आणि डॉ. ऋतुजा मॅडम, चर्चचे अध्यक्ष अॕलनआदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवर यांच्या कडून वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडने आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेत सहभागी असलेल्या सर्व स्वयंसेवकांचे कौतुक केले. तर तलासरी नगर परिषदेने मार्फत या कार्यक्रम सहभागी झालेल्या स्वच्छता स्वयंसेवक यांना प्रमाणपत्रे आणि पुरस्कार मान्यवर यांच्या हस्ते/ उपस्थित प्रदान केले.
या कार्यक्रमाचे वेळी, चर्च प्रतिनिधी संगीता मॅडम म्हणाल्या, “वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडची स्थापना १९६४ मध्ये दुसरे आगमन करणारे ख्रिस्त आनसांगहोंग यांनी केली होती आणि आज ते माता परमेश्वर, नवीन यरूशलेम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. १७५ देशांमध्ये ७,८०० हून अधिक स्थानिक चर्च आणि ३९ लाखांहून अधिक नोंदणीकृत सदस्यांसह, ते बायबलच्या शिकवणींनुसार प्रेमाचे आचरण करून पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांची सेवा करते. “मदर्स स्ट्रीट” स्वच्छता मोहीम सारखे जागतिक स्वयंसेवक कार्य संयुक्त राष्ट्र (UN) आणि त्याच्या शाश्वत विकास ध्येयांशी (SDGs) सुसंगत आहे. या कार्यासाठी, त्यांना अमेरिका (US) प्रेसिडेंट्स व्हॉलंटियर सर्व्हिस अवॉर्ड, इंग्लंडच्या (UK) राणीचा अवॉर्ड आणि अनेक देशांकडून इतर पुरस्कार मिळाले आहेत.” त्यांना महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांकडून ही प्रशंसापत्र मिळाले. तलासरी जि.पालघर. येथील चर्च ऑफ गॉड शाखेचे सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर माहिती श्री प्रविण पाटील यांच्या कडून मिळत आहे.