Uncategorized

दिवे-अंजुर पेट्रोल पंप येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या कमानी lला “ आई गावदेवी माता “ असे नामकरण

दिवे-अंजुर पेट्रोल पंप येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या कमानी lला “ आई गावदेवी माता “ असे नामकरण पालघर (प्रतिनिधी)आज दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ रोजी शेतकरी संघटना व संघटनेचे ४ ग्रामपंचायत सदस्य श्री.संदिप कमलाकर म्हात्रे, सौ.प्रिया अरविंद म्हात्रे, सौ.रुपाली प्रवीण म्हात्रे, सौ.माधुरी विशाल म्हात्रे समवेत गावातील रखडलेल्या विकासकामांबद्दल व दिवे-अंजुर पेट्रोल पंप येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या कमानी lला “ आई गावदेवी माता “ असे नामकरण व्हावे तसेच शासनाच्या नव्याने निघालेल्या घरपट्टी व पाणीपट्टी मध्ये ५०% ची अमलबजावणी व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले.
सदर गावातील रखडलेल्या विकासकामातील शिरुख येथे स्मशानभुमीला पत्राशेड व बसायला बाकडे या कामासाठी शेतकरी संघटनेकडुन ग्रामपंचायत सदस्य संदिप कमळाकर म्हात्रे यांच्या नावे विकासकामाची मंजुरी मिळणेबाबत अर्ज देण्यात आले आहे.
एकात्मतेतुन समृद्धीकडे
गावचा सर्वांगीण विकास, हाच संघटनेचा ध्यास!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button