Uncategorized

हरिदया फाउंडेशन (रजि.) यांच्या वतीने ब्लँकेट्स व ऊनी कपडे वितरण शिबिराचे आयोजन.

हरिदया फाउंडेशन (रजि.) यांच्या वतीने ब्लँकेट्स व ऊनी कपडे वितरण शिबिराचे आयोजन.
पालघर, (प्रतिनिधी)दि. २८ डिसेंबर २०२५: हरिदया फाउंडेशन (रजि.) यांच्या वतीने आज दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता मनोर गावातील ताकवाहाल पाडा १ व २ येथे ब्लँकेट व ऊनी कपडे वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
हे शिबिर हरिदया फाउंडेशन (रजि.) चे अध्यक्ष डॉ.राजेश हरिनाथ यादव यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. शिबिरात ३०० पेक्षा अधिक लोकांच्या उपस्थितीत प्रौढ व विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचा संदेश, आधुनिक शिक्षणाचे महत्त्व तसेच करिअर घडवण्याबाबत मार्गदर्शन ही करण्यात आले.
एकूण २२७ ब्लँकेट वितरित करण्यात आल्या.
लाभार्थींना गावात ड्रग्सचा वापर न करण्याची शपथही देण्यात आली.
या कार्यक्रमात फौजदार यादव, रेखेश जैन,डॉ. सूरज, रवींद्र, मुकेश,योगेश, मिंटू साहू, देवू पाडेकर, तितर मुखिया आणि दलवी बुवा यांनी सहभाग घेतला.
हरिदया फाउंडेशन समाजातील दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी आणि व्यसनमुक्ती सारख्या सामाजिक कार्यासाठी कटिबद्ध आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button