Uncategorized

जिल्हा परिषद शाळांतील रिक्त पदांवर भरती प्रक्रियेला गती
८ जानेवारीला समुपदेशन; यापूर्वी गैरहजर उमेदवारांनाही संधी

जिल्हा परिषद शाळांतील रिक्त पदांवर भरती प्रक्रियेला गती
८ जानेवारीला समुपदेशन; यापूर्वी गैरहजर उमेदवारांनाही संधी

पालघर,(प्रतिनिधी) दि. १ जानेवारी २०२६
पालघर जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शाळांमधील मानधन तत्त्वावरील कंत्राटी पद्धतीने रिक्त पदे भरण्यासाठी शिक्षण विभागामार्फत भरती प्रक्रियेला गती देण्यात आली असून, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड झालेल्या उमेदवारांसाठी समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद पालघर यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या प्रक्रियेत यापूर्वी दि. ०३ एप्रिल २०२५ व २९ मे २०२५ रोजी आयोजित समुपदेशन प्रक्रियेला इयत्ता १ ली ते ५ वी च्या गटातील व इयत्ता ६ वी ते ८ वी च्या (विज्ञान आणि गणित गटातील) गैरहजर राहिलेल्या आणि रिक्त जागे अभावी किंवा सोयीच्या जागा न मिळाल्यामुळे नकार दिलेले उमेदवार त्यांना दि. ८ जानेवारी २०२६ रोजी पुन्हा एकदा अंतिम संधी देण्यात येणार आहे. अशा उमेदवारांनी सदर दिवशी उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सोनाली मातेकर यांनी केले आहे.

उमेदवारांसाठी समुपदेशन प्रक्रिया दि. ८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता क्रांतिसूर्य बिरसा मुंडा दालन, कक्ष क्रमांक १२२, जिल्हा परिषद पालघर, नवीन प्रशासकीय इमारत, पालघर–बोईसर रोड, कोळगाव, तालुका व जिल्हा पालघर येथे पार पडणार आहे.

संबंधित उमेदवारांची यादी तसेच सविस्तर प्रसिद्धी पत्रक जिल्हा परिषद पालघरच्या अधिकृत संकेतस्थळावर www.zppalghar.gov.in उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया राबविण्यात येत असून, पारदर्शक व गुणवत्ताधारित निवडीवर भर देण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button