Uncategorized

पालघर येथे दांडेकर मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा.

पालघर येथे दांडेकर मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा.

पालघर(प्रतिनिधि ):- सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील मराठी वाङ्‌मय मंडळातर्फे मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महान कवि वि. वा.शिरवाडकर ( कुसुमाग्रज)यांच्या जयंतीदिना निमित्ताने ‘मनमुराद’ कविता,गाणी, गप्पा आणि बरच काही..या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मराठी भाषेतील साहित्य आणि साहित्यातील सौंदर्य टीम मुरादने विद्यार्थ्यांसमोर सादर केल्या. ओवी, भजन, भक्तीगीत, भावगीत अशा विविध प्रकारातील गीत रचना सादर करीत समीर पवार व अस्मिता जाधव, भाग्यश्री गोखले यांनी आपल्या सुरेल आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांना साहिल म्हस्कर यांनी वादनाची उत्तम साथ दिली. शैलेश पाटील कवितांचे प्रभावी सादरीकरण करत काही आठवणी व किस्से सांगून संपूर्ण कार्यक्रमाला एकसंघ स्वरूप देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अण्णाभाऊ साठे यांची ‘माझी मैना गावाला राहिली’, नामदेव ढसाळ यांच्या ‘माणसाने’ या कवितातून साहित्यातली सामाजिक, राजकीय जाणीव उपस्थितांना करून दिली. ना. धो. महानोर आणि मंगेश पाडगावकर यांच्या प्रेमकवितांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मराठी विभागाच्या कांचन भुयाळ, संस्कृती राहे आणि मयुरी भोईर या विद्यार्थिनींनी मराठी भाषेविषयी मल्हार कोळी बोलीत कविता सादर केली आणि त्या झी २४ तास वर झळकल्या याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सीए सचिन कोरे, कोषाध्यक्ष मंगेश पंडित, सचिव सुधीर कुलकर्णी, सदस्य रामप्रकाश निराला तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किरण सावे, उपप्राचार्य डॉ. तानाजी पोळ आवर्जून उपस्थित होते. मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित असून कलावंतांच्या सादरीकरणाला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. प्रास्ताविक प्रा. विवेक कुडू, आभार प्रा. यादव मोरे तर सूत्रसंचालन डॉ. दर्शना चौधरी यांनी केले. जेन झी पिढीला मराठीचा लळा लावण्यासाठी हा कार्यक्रम फारच मोलाचा ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button