Uncategorized

केंद्रीय लोक निर्माण विभाग, सेवानिवृत्त कर्मचा-यांचे पहिले स्नेहसंमेलन संपन्न!

केंद्रीय लोक निर्माण विभाग, सेवानिवृत्त कर्मचा-यांचे पहिले स्नेहसंमेलन संपन्न!
६ डिसेंबर
पालघर ( एच लोखंंडे ) केंद्रीय लोकनिर्माण विभाग हा केंद्र सरकारच्या, केंद्रीय इमारती, रस्ते, आणि पायाभूत सुविधांची निर्मिती – देखभाल व व्यवस्थापन करण्याचे कार्य, मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या गृहनिर्माण /शहरी व्यवहार मंत्रालय अंतर्गत. सरकारचे बिल्डर – डेव्हलपर आणि व्यवस्थापक म्हणून कार्य करीत, सर्व बांधकाम आणि पायाभूत सुविधांच्या गरजा पूर्ण करणारा एक प्रमुख विभाग आहे. जो गुणवत्ता व टिकाऊपणावर लक्ष केंद्रित करतो. या केंद्रीय लोक निर्माण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी – कर्मचा-यांचे पहिला स्नेहसंमेलन मेळावा, दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यात, ठाणे- पश्चिम, येथे असलेल्या क्लब हाऊस, दोस्ती विहार, फोखरण रोड नं १ येथे मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला आहे.
श्री .अरविंद आगाशे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.असून, गोवा राज्यातील व महाराष्ट्र राज्य मधील मुंबई, पालघर, पुणे, विरार, आदी विभागातून अनेक सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.
चित्रपट अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांचे वडील श्री. ए. व्ही बेंद्रे सेवानिवृत्त कर्मचारी यांनी वयाच्या ९१ वर्षीही कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले, म्हणून त्यांचे विषेश कौतुक करिता त्यांनी मान्यवर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले.. त्याचप्रमाणें वयाची ८१ वर्षे पूर्ण करणारे श्री. बी. डी.वाघमारे, श्री .एस. एस नातू, श्री.नारायण पितांबरम, श्री .हेमन खिलनानी, श्री.बी. डी. माणगांवकर, आणि श्री.आर. डी. उपाध्याय यांचाही पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला
यावेळी उपस्थित सेवानिवृत्त कर्मचा-यांनी आपापल्या परीने अभंग, चित्रपट गीते, लावणी, नृत्ये आदी सादर करून कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांचे मनोरंजन करून कार्यक्रमाचा आनंद लुटला.
कार्यक्रमाची प्रस्तावना – सोनाली भांगले, यांनी सादर केली .तर माधुरी सारंगपाणी व दीपक खोत यांनी सूत्रसंचालन कार्य सांभाळीत सर्वांना आनंदाची मेजवानी दिली. श्री अरविंद आगाशे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button