पालघर पूर्व भागातील प्रवाशांसाठी पालघर पुर्वेकडे ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन सुरू, श्री केदार काळे – यांच्या प्रयत्नांना यश


पालघर पूर्व भागातील प्रवाशांसाठी पालघर पुर्वेकडे ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन सुरू, श्री केदार काळे – यांच्या प्रयत्नांना यश
२७ मार्च
पालघर ( एच लोखंंडे ) पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण. झाल्यापासून पालघर पूर्वेकडील भागात कामधंदा, व्यावसाय आणि नोकरी निमित्ताने अनेक कुटुंबे पालघर मध्ये येऊन राहत असल्याने, मधील पुर्वेकडील भागाचा विकास होऊन अनेक रहिवासी सोसायटीच्या संख्येत झपाट्याने वाढत आहे. त्यामध्ये राहणाऱ्या लोकांची लोकसंख्या वाढती आहे. पण पालघर पूर्वेकडून येणाऱ्या, रेल्वे प्रवाशांना पश्चिमेला येऊन रेल्वे तिकीट व सीजन तिकीट काढावे लागत होते.
या अनुषंगाने २६ सप्टेंबर २०२५ रोजी शिवसेनेचे प्रवक्ते – श्री केदार काळे यांनी रेल्वे प्रशासनाकडे लेखी व तोंडी मागणी केलकी पालघर रेल्वे स्टेशनच्या पूर्व भागात तिकीट विंडो रेल्वेने सुरू करावा किंवा जोपर्यंत तिकीट विंडो चे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन सुरू करावे. श्री. केदार काळे यांच्या या निवेदनावर वेळोवेळी पश्चिम रेल्वेचे मंडल – वाणिज्य निरीक्षक श्री किशोर नाहकानी यांच्याकडे श्री केदार काळे पाठपुरावा करीत त्यांच्या या कार्यला रेल्वे प्रवासी सह संघटना व स्थानिक लोकप्रतिनिधीं यांच्या पाठपुराव्यामुळे रेल्वेने पालघर पूर्वेकडे डेक बांधून तिकीट विंडो चे काम चालू केले आहे. परंतु पालघर पुर्वेकडील रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन सुरू केलेले आहे.
याबद्दल श्री.केदार काळे यांनी पश्चिम रेल्वेचे पदाधिकारी व विशेषता मंडळ वाणिज्य निरीक्षक श्री किशोर नाहकानी यांना धन्यवाद देत, प्रवासी जनतेला आवाहन केले आहे. आपण ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन चा उपयोग करावा. यातून आपल्याला लोकलची रेल्वे तिकिटे मिळतीलच तसेच मासिक तिकीट (रेल्वेपास ) मेल एक्सप्रेसची तिकिटे मिळू शकतील. आणि लवकरात लवकर पूर्वेकडील भागात कायमस्वरूपी तिकीट विंडो रेल्वेने सुरू करावी अशीही मागणी करीत आहे. याबरोबर डहाणू – बोईसर – सफाळे येथेही रेल्वेने ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन सुरू करण्यात यावे व केले असल्यास पश्चिम रेल्वे अधिकारी, स्टेशन मास्तर यांना धन्यवाद.