घराचा १२५ वा
वाढदिवस १२ डिसेंबर २०२५
रोजी मोठ्या उत्साहात साजरा





घराचा १२५ वा
वाढदिवस १२ डिसेंबर २०२५
रोजी मोठ्या उत्साहात साजरा
बुद्रुक:_(प्रतिनिधी)
आमचा परिवार हरकुळ बुद्रुक गावात रहात असून आमचे घर १२५ वर्षांपूर्वीचे आहे. या आमच्या घरात
१९०२ ते १९६० असे ५८ वर्षे पंचक्रोशीचे पोस्ट ऑफिस होते…
त्यामुळे हे घर जुना पोस्ट
म्हणुन आजही ओळखले जाते..
या आमच्या घराचा १२५ वा
वाढदिवस १२ डिसेंबर २०२५
रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला…
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री
नितेश राणे साहेब या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार होते परंतु अधिवेशन कालावधी वाढल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत…त्यांच्या तर्फे शुभेच्छा देताना श्री संदेश (गोट्या)सावंत उपाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा
यांनी घराचा वाढदिवस साजरा करण्याच्या अभिनव कल्पनेस मनःपूर्वक दाद देऊन चिंदरकर परिवाराचे कौतुक केले आणि आदरणीय मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री श्री नितेश राणे साहेब यांच्या वतीने…
हा ऐतिहासिक ठेवा जपणार्या
परिवाराला घरापर्यंत एक वर्षाच्या आत रस्ता बनवून देण्याचे आश्वासन दिले..
या कार्यक्रमास श्री सतीश सावंत (अध्यक्ष सिंधुदुर्ग बँक)
श्री संदेश पारकर..अध्यक्ष शिवसेना (सिंधुदुर्ग जिल्ह्या )उबाठा
श्री सुशांत नाईक (युवा अध्यक्ष )शिवसेना (उबाठा)
श्री आनंद ठाकूर..सरपंच हरकुळ बुद्रुक
श्री आयुब पटेल… उपसरपंच हरकुळ बुद्रुक
या सर्व मान्यवरांनी या अभिनव कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या..
गावातील मान्यवर आणि गावकरी
या कार्यक्रमास मोठय़ा संख्येने उपस्थित होते…
चिंदरकर परिवाराने या कार्यक्रमाच्या
निमित्ताने १२५ झाडे लावण्याचा संकल्प जाहीर केला..
सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करून आभार व्यक्त केले..
……….🙏🙏………….
धोंडू विश्वनाथ चिंदरकर..8693092211
धाकू रघुनाथ चिंदरकर
विनायक रघुनाथ चिंदरकर
भालचंद्र गणेश चिंदरकर
किशोर रघुनाथ चिंदरकर
सत्यवान विश्वनाथ चिंदरकर
नारायण भास्कर चिंदरकर
साईनाथ भास्कर चिंदरकर
बंधु भास्कर चिंदरकर
भगीरथ भास्कर चिंदरकर
नंदकुमार प्रमोद चिंदरकर
ज्ञानेश्वर रमेश चिंदरकर