Uncategorized

न्यू इंग्लिश स्कूल भालोद येथे शहीद दिन साजरा..

न्यू इंग्लिश स्कूल भालोद येथे शहीद दिन साजरा..

प्रतिनिधी / विशाल दांडगे

भालोद: २३ मार्च २०२५

भालोद: न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर महाविद्यालय भालोद येथे २३ मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आर. एस. जावळे हे होते प्रथम क्रांतिकारक शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन केले.त्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना आपल्या भाषणात त्यांनी क्रांतिकारक शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव व इतर समाज सुधारकांनी दिलेल्या बलिदान व त्यागामुळेच आपल्याला स्वातंत्र्याचा उपभोग आज घेता येत आहे ,त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही यासाठी आपण सर्वांनी देशाच्या हितासाठी एकजूट एकत्र राहिले पाहिजे.कुमारी अनुराधा जोशी या विद्यार्थिनीने शहीद दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डी. एस. देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न दिनेश सरोदे यांनी केले होते, या वेळी कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button