Uncategorized

भगिनी समाज शाळेत बालदिनानिमित्त बालसभा संपन्न

Press Note

भगिनी समाज शाळेत बालदिनानिमित्त बालसभा संपन्न
पालघर- (प्रतिनिधी)स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिवस१४ नोव्हेंबर हा आहे म्हणून ह्या दिवस निमित्ताने’बालदिन’ म्हणून साजरा केला जातो. पालघर येथील भगिनी समाज संस्था संचलित प्राथमिक विद्यामंदिर भगिनी समाज शाळेत विद्यार्थ्यांची बालसभा आयोजित केली होती. सदरची बालसभा ही इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक चौदावा- ‘बालसभा’ या पाठाचे सादरीकरण बालसभेच्या माध्यमातून सादर करण्यात आले. बालसभेचे अध्यक्ष विद्यार्थी, जीत जोशी व प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका प्रीती वर्तक व शिक्षक वृंद उपस्थित होते. प्रारंभी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. वेशभूषेत जियान चौधरी यांने चाचा नेहरूची भूमिका साकारली होती. या बालसभेत उत्कर्षा पवार, स्वरा गाडगीळ, समृद्धी धम्पलवार, आराध्या पवार, आदित्य डेंगाने, कौशिक चौधरी, चैतन्य पाटील, चिन्मय सांगळे, विहांग वैद्य, मोनिषा पाटील, रिद्धी तरे, जीविका लडे,श्रेय शिरगावकर, आर्यन गायकवाड, शौर्य दळवी, प्रयांक पाटील, निहार नाईक, केदार पाटील व कवीश राऊत या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मराठी विषयाचे अध्यापक दर्शन भंडारे यांनी विद्यार्थ्यांना बालसभेचे मार्गदर्शन केले होते. तसेच बालदिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ, गोड खाऊ व संगीत खुर्ची स्पर्धेच्या आयोजन केले होते.
अशा प्रकारे भगिनी समाज शाळेत बालदिन आनंदाने साजरा झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button