Uncategorized

कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाचे सात दिवसीय विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर संपन्न.

कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाचे सात दिवसीय विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर संपन्न.

तलासरी (प्रतिनिधी)तलासरी येथील कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाचे सात दिवसीय विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर आशगड येथील कॉम्रेड शामराव परुळेकर माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात संपन्न झाले. ३० डिसेंबर २०२५ रोजी या शिबिराचा समारोप करण्यात आला.

​सात दिवसांच्या या कालावधीत एनएसएस स्वयंसेवकांनी आशगड गावात विविध सामाजिक उपक्रम राबवले. यामध्ये प्रामुख्याने
​स्वच्छता मोहीम संपूर्ण गावात स्वच्छता अभियान राबवून ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.
​पथनाट्ये आणि प्रभातफेरीच्या माध्यमातून झाडे लावा पर्यावरण वाचवा, कचऱ्याचे व्यवस्थापन मानसिक ताण, मतदान जनजागृती, स्त्री सक्षमीकरण , व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या विषयांवर प्रभावी प्रबोधन केले.
​ विद्यार्थ्यांनी गावच्या परिसरात श्रमदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
सदर शिबिरात २४/१२/२०२५ रोजी डॉ.निपून शाह -स्कील डेव्हलपमेंट कडून विकासकडे युवा,२५/१२/२०२५ ॲडव्होकेट संजीव जोशी -नवीन भारतीय कायदा आणि संविधान ,२६/१२/२०२५ श्री अनिल हडळ आणि संगीता हडळ आपत्ती निवारण योजना अंतर्गत स्वयंस्वरक्षण चे धडे,२७/१२/२०२५ श्री.महेश करिया-विद्यार्थी आणि शिस्त,२८/१२/२०२५ चंदू गोवारी-एड्स अवेरनेस,२९/१२/२०२५ श्री अण्णा कडलस्कर -अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध विषयांवर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आली.

​शिबिराच्या समारोप प्रसंगी आदिवासी प्रगती मंडळ संस्थेचे सचिव रुपेश राणे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अजितदादा नार्वेकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
​अजितदादा नार्वेकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “अशा शिबिरांमधून मिळणारे अनुभव विद्यार्थ्यांना भविष्यात एक जबाबदार आणि आदर्श नागरिक म्हणून घडवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.” तर रुपेश राणे यांनी स्वयंसेवकांना आवाहन केले की, “या शिबिरात तुम्ही जे चांगले गुण आणि कौशल्ये शिकलात, ती आयुष्यात कायम अंमलात आणावीत.”
​प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांनी नमूद केले की, “राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ सेवा नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.”

​हे शिबीर यशस्वी करण्यासाठी आशगडचे सरपंच दिलपेश दौडा, कॉम्रेड शामराव परुळेकर माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य किशोर चौरे आणि समस्त ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच आशगड ग्रामपंचायतीच्या मदतीमुळे शिबीर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.
​कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन राऊत, शेफाली गहला, शिक्षकेतर कर्मचारी आशिष दौडा आणि सर्व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button