मनसेचे चार उमेदवार पालघर नगरपरिषदेच्या रिंगणात!
अविनाश जाधव यांची उपस्थिती; प्रचाराला वेग.

मनसेचे चार उमेदवार पालघर नगरपरिषदेच्या रिंगणात!
अविनाश जाधव यांची उपस्थिती; प्रचाराला वेग.
पालघर –(प्रतिनिधी) आगामी पालघर नगरपरिषद निवडणुकीत मनसेने आपली ताकद दाखवत तब्बल चार वॉर्डांत चार उमेदवार मैदानात उतारले आहेत. मनसेचे उत्साही युवा नेते हिमांशू राऊत (वॉर्ड १३), सुनील राऊत (वॉर्ड १२), निशांत धोत्रे (वॉर्ड १०) आणि निखिल गायकवाड (वॉर्ड ४) यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करताच पालघरच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.
मनसेच्या तडफदार कामकाजासाठी ओळखले जाणारे प्रदेशाध्यक्ष अविनाश जाधव यांनी स्वतः पालघरात उपस्थित राहून उमेदवारांना पाठिंबा दिला. त्यांच्या उपस्थितीमुळे मनसेचा प्रचार अक्षरशः गरमागरम झाला असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
अविनाश जाधव यांनी जनसंपर्क दौऱ्यात नागरिकांशी संवाद साधत सांगितले की,
“पालघरमध्ये विकासाची भाषा करणारे, काम करणारे आणि भ्रष्टाचाराला सरळ टक्कर देणारे उमेदवार मनसेकडे आहेत. या चारही उमेदवारांना घणाघात मतांनी विजयी करा.”
चारही उमेदवारांनीही स्थानिक प्रश्न, विकास आणि पारदर्शक प्रशासन यांना प्राधान्य देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
मनसेच्या आगमनामुळे पालघर नगरपरिषदेतील रिंगण अतिशय रंगतदार आणि रोमांचक झाले आहे.
आगामी दिवसांत मनसेचा प्रचार आणखी वेग घेणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.