Uncategorized

उ. बा. ठा प्रभागातून शिवसेनेचे उमेदवार राहुल प्रकाश पाटील प्रथमच रिंगणात


उ. बा. ठा प्रभागातून शिवसेनेचे उमेदवार राहुल प्रकाश पाटील प्रथमच रिंगणात

पालघर –(प्रतिनिधी) आगामी पालघर नगर परिषद निवडणुकीत उ.बा.ठा प्रभागातून शिवसेना (उद्धव बाळासाहे ठाकरे गट) चे उमेदवार म्हणून श्री. राहुल प्रकाश पाटील पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरले आहेत. प्रभागातील स्थानिक प्रश्नांवर थेट काम करण्याचा त्यांचा अनुभव आणि जनसंपर्क यामुळे त्यांची उमेदवारी चर्चेत आली आहे.

श्री. राहुल पाटील यांनी प्रभागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधत सांगितले की, “रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि ड्रेनेज या प्रमुख समस्यांवर त्वरित उपाय करणे माझे पहिले प्राधान्य असेल. नागरिकांना त्रास न होता कामे पूर्ण करण्याची जबाबदारी मी पार पाडेन.”

तरुण वर्ग, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. “प्रभागात क्रीडा सुविधा, अभ्यासिका, महिला मदत केंद्र आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा निर्माण करणे अत्यावश्यक आहे.तसेच मी ऐप तयार करणार आहे .व ते ऐप माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांना दिले जाईल.त्यामुळे त्यांना होणाऱ्या अडचणी मी लगेच त्याचे निधान करून सोडवण्यात येईल असे प्रयत्न करू .मी निवडून आलो तर या सर्व गोष्टींसाठी ठोस पावले उचलणार आहे,” असे पाटील यांनी नमूद केले.

शिवसेनेच्या गप्पागोष्टींपासून ते घरगुती भेटीपर्यंत, स्थानिकांच्या समस्या ऐकून त्यावर मार्गक्रमण करण्याची शैली त्यांची लोकप्रिय ठरत आहे. नागरिकांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल पाटील यांनी मतदारांना आवाहन केले की, “उ.बा.ठा प्रभागाच्या विकासासाठी तुमचा एक मताचा पाठिंबा माझ्यासाठी प्रेरणा ठरेल. प्रामाणिकपणे काम करून प्रभागाचा चेहरा बदलण्याचा माझा संकल्प आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button