केंद्र सरकारच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ आणि युथ बिल्ड foundation यांच्या माध्यमातून व Toshwa vision foundation यांच्या यशस्वी व प्रभावी कार्य शाळा संपन्न.



केंद्र सरकारच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ आणि युथ बिल्ड foundation यांच्या माध्यमातून व Toshwa vision foundation यांच्या यशस्वी व प्रभावी कार्य शाळा संपन्न.
मोखाडा (प्रतिनिधी)केंद्र सरकारच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ आणि युथ बिल्ड foundation यांच्या माध्यमातून व Toshwa vision foundation यांच्या यशस्वी व प्रभावी व्यवस्थापनातून पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात सूर्यमाळं येथे महिला उद्योजक क्षमता बांधणी कार्यशाळा यशस्वी पार पडली.
प्रमुख मार्गदर्शक. TOSHWA VISION FOUNDATION चे संस्थापक विश्वास पाटील,सामाजिक कार्यकर्ते श्री.हेमंत शिंगाडे,यांनी कार्यशाळेत मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच सूर्यमाळं ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.गीता गवारी मॅडम यांनी या सर्व कार्यशाळेसाठी महत्वाची भूमिका पार पडली व सर्व प्रकारचे सहकार्य केले.
तसेच तेथील सामाजिक कार्यकर्ते ममता बदादे , दीक्षिता पाटील,विश्वनाथ पाटील यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाची भूमिका पार पाडली.
या कार्यक्रमाला गावकऱ्यांचा आणि मोठा सहभाग प्राप्त झाला.
विषय ऑनलाईन अर्ज प्रक्रिया,छोट्या उद्योगाचे व्यवस्थापन आणि महिला सक्षमीकरण,डिजिटल साक्षरता,Gem पोर्टल,
या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
महिलांनी उद्योग सुरू करताना काही बेसिक कौशल्य आणि सामान्य ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे.सुरुवात सातत्य आणि धीर या गोष्टी व्यवसायाला खूप पुढे घेऊन जातात. वेळी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सक्सेस स्टोरी सुद्धा सांगण्यात आल्या.
तसेच हा कार्यक्रम सर्व ग्रामपंचायत आणि तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर सुद्धा सुरू करण्यात येत आहे.