Uncategorized

दांडेकर महाविद्यालयाच्या अनुश्री दमणकरला मुंबई विद्यापीठाची दोन सुवर्णपदके

दांडेकर महाविद्यालयाच्या अनुश्री दमणकरला मुंबई विद्यापीठाची दोन सुवर्णपदके
पालघर (प्रतिनिधी)सोनोपंत दांडेकर कला, व्ही. एस. आपटे वाणिज्य व एम. एच. मेहता विज्ञान महाविद्यालय, पालघर येथील विद्यार्थिनी अनुश्री दमणकर हिने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारंभ २०२५ मध्ये तिला गणित विषयातील “वृंदा प्रभू सुवर्णपदक” तसेच “कै. सुमनबाई मुरलीधर भामरे सुवर्णपदक” जाहीर झाले आहे.
मुंबई विद्यापीठाचा हा दीक्षांत समारंभ शनिवार, दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता, फोर्ट, मुंबई येथील सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात संपन्न होणार आहे. या समारंभात कु. अनुश्री दमणकर यांना ही सुवर्णपदके प्रदान करण्यात येणार आहेत.
कु. अनुश्री हिने आपल्या सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्तबद्ध अभ्यास आणि गुणवत्तेच्या जोरावर हे यश संपादन केले असून तिच्या या कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अनुश्रीच्या या उज्ज्वल कामगिरीबद्दल बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी यापूर्वी अर्थशास्त्र, भूगोल, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, तत्वज्ञान अशा अनेक विषयात दांडेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके मिळविली आहेत. त्यामध्ये अनुश्रीने आपल्या यशाने भर टाकली आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सी.ए. सचिन कोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे, उपप्राचार्य डॉ. महेश देशमुख, उपप्राचार्य प्रा.डॉ. तानाजी पोळ, गणित विभागप्रमुख प्रा. दिपाली माळी, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थीवर्ग यांनी तिचे अभिनंदन केले असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button