माघी गणेश जयंतीनिमित्त मुख्य तिकीट निरीक्षक विकास पाटील यांच्या निवासस्थानी आकर्षक आरास


माघी गणेश जयंतीनिमित्त मुख्य तिकीट निरीक्षक विकास पाटील यांच्या निवासस्थानी आकर्षक आरास
ठाणे / प्रतिनिधी :
माघी गणेश जयंतीनिमित्त मुख्य तिकीट निरीक्षक श्री. विकास पाटील यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाची अत्यंत सुंदर व भक्तीमय आरास करण्यात आली होती. पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या गणेशमूर्तीने परिसरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या पवित्र प्रसंगी सम्माननीय सौ. पल्लवी ताई पवन कदम (माजी उपमहापौर, ठाणे महानगरपालिका) यांनी सदिच्छा भेट देत श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. त्यांनी गणेश आरासेचे कौतुक करत पाटील कुटुंबीयांना माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान उपस्थित भाविकांनीही गणरायाचे दर्शन घेत उत्साहात माघी गणेश जयंती साजरी केली. भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवणारा हा सोहळा नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला.