Uncategorized

सफाळे पो.ठाणे द्वारे सन २०२५, जि. परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका निमित्ताने जनतेला आवाहन*

सफाळे पो.ठाणे द्वारे सन २०२५, जि. परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका निमित्ताने जनतेला आवाहन*

९ नोव्हेंबर 

सफाळे ( एच लोखंंडे ) सन २०२५, जिल्हा परिषद – पंचायत समिती येत असणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने सफाळा पोलीस ठाणे कडुन नागरिकांना आवाहन.

    लोकशाही मध्ये लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी निवडणूका येतील, आणि जातील परंतु सर्वसामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी यांनी आपला लोकशाहीचा हक्क बजावत असताना, कायद्याचे पालन करीत, शांतता- सुव्यवस्था अबाधित राखणे हे प्रत्येकांचे कर्तव्य आहे.

        या अनुषंगाने सफाळे पोलिस ठाणे ता.जि.पालघर प्रभारी पो. अधिकारी श्री. दत्ता शेळके सपोंनी याचे सर्व मतदाते, लोकप्रतिनिधी या सर्वांना आवाहन आहे. कायदा मोडू नका.

           कोणत्याही पक्षाच्या समर्थकांशी वाद, धमकी, भडक वक्तव्य किंवा हिंसाचार टाळावा.

 सोशल मीडियावर जबाबदारीने वागा. चुकीचे पोस्ट, फोटो, मेसेज किंवा व्हिडिओ शेअर केल्यास सायबर गुन्हा म्हणून कडक कारवाई केली जाईल.

        प्रचार, सभा, मिरवणूक यासाठी पूर्वपरवानगी घ्या.– नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई होईल. वाद विवाद निर्माण होणारी परिस्थिती असल्यास त्वरित पोलीसांना कळवा. कारण – लहानसा वाद हि निवडणुकीनंतर मोठा गुन्हा ठरू शकतो. आपले हक्क बजावताना इतरांच्या अधिकारांचा सन्मान करा.

⸻———————

  🗳️ निवडणूक हा लोकशाहीचा सण आहे. प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु  राजकीय आवेश, राग किंवा चुकीच्या भावनेतून घेतलेले निर्णय आयुष्यभराचा परिणाम घडवू शकतात. प्रचार आणि पोस्टर संपतात — पण गुन्हेगार यांच्या गुन्ह्याची नोंद कायम स्वरूपी पोलीस रेकॉर्डमध्ये राहतो. पुढील चौकशी, जामीन, वकील, न्यायालयीन प्रक्रिया दीर्घकाळ चालतात. यामुळे सरकारी सेवा, नोकरी मिळण्यासाठी अडथळा निर्माण होऊ शकते. गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या व्यक्तींना पोलीस, सैन्य किंवा सरकारी नोकरीस अपात्र ठरवले जाते. तसेच पासपोर्ट, परदेशी प्रवास, व्हिसा मंजूरीस विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

          निवडणूक उमेदवारीवर 

गुन्हा दाखल असल्यास उमेदवारी अर्ज रद्द होऊ शकतो किंवा निवडणुकीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  “गुन्हेगार” हा शिक्का समाजात विश्वास आणि प्रतिष्ठा कमी करतो — आणि तो आयुष्यभर पुसला जात नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button