Uncategorized

मुंबई -लोअर परेल, येथे जेष्टांचे  मनोबल वाढविण्यासाठी करा ओके स्पर्धा संपन्न

मुंबई -लोअर परेल, येथे जेष्टांचे  मनोबल वाढविण्यासाठी करा ओके स्पर्धा संपन्न.

९ नोव्हेंबर 

मुंबई :(प्रतिनिधी)  फॅमिली वेलफेअर सेंटर, लोअर परेल व रोटरी क्लब डाऊन टाऊन, सी लँड व इंटरव्हील क्लब, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, लोअर परेल येथील, फॅमिली वेलफेअर सेंटर च्या कार्यालयात, जेष्टांसाठी करा ओके स्पर्धा नुकतीच आयोजित करून मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली.

      या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक – ज्ञानेश्वर चव्हाण, द्वितीय – किसन चव्हाण व तृतीय  – शांताराम चिपळूणकर व राजश्री सावर्डेकर यांना विभागून देण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ – पारितोषिक शिवराम पालव, सूर्यकांत कदम व कुंदना पंडित यांना देण्यात आले.

         लोटरी क्लब मुंबई च्या अध्यक्षा – चंद्रा खोना व इंनरव्हील क्लब मुंबई यांच्या अध्यक्षा – आशिता दावडा यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धाकांचा सन्मान करण्यात आला.तर  उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी आलेल्या स्पर्धक व उपस्थित फॅमिली वेफअर एजन्सी च्या असंख्य  ज्येष्ठ पुरुष – महिला यांना मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button