Uncategorized

रिपाइं (आ) महिला आघाडीतर्फे पालघरमध्ये संयुक्त जयंती महोत्सव व महिला स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

रिपाइं (आ) महिला आघाडीतर्फे पालघरमध्ये संयुक्त जयंती महोत्सव व महिला स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.


पालघर | प्रतिनिधी
दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) महिला आघाडी, पालघर जिल्हा यांच्या वतीने राजमाता जिजाऊ, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती माता सावित्रीबाई फुले व त्यागमूर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव तसेच महिलांचे स्नेहसंमेलन (हळदीकुंकू) कार्यक्रम पालघर येथील काँग्रेस भवनात अत्यंत उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन रिपाइं (आ) चे पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सौ. कुसुमताई तिवारी (भाजप कार्यकर्त्या), सौ. लक्ष्मी हजारी (भाजप ज्येष्ठ नेत्या), सौ. बीना तिवारी (ट्रस्टी, दांडेकर कॉलेज), शालिनी मेनल, चंदा दुबे (दक्षता समिती सदस्य), अनिता राऊत (अध्यक्ष, दिव्यांग संघटना), सविता मल्लाह (भाजप कार्यकर्त्या) व सुवर्णा जगताप (शहराध्यक्ष, वसई–विरार) या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. सर्व मान्यवरांनी महिलांच्या सक्षमीकरणावर, शिक्षणाचे महत्त्व व सामाजिक एकात्मतेवर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास पालघर शहर व परिसरातील विविध समाजातील सुमारे ५०० ते ६०० महिलांची उपस्थिती लाभली. महिलांसाठी आयोजित स्नेहसंमेलन व हळदीकुंकू कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजोग उपाध्याय (संघटक, पालघर जिल्हा महिला आघाडी), विमल चौधरी, सुप्रिया जाधव (उपाध्यक्ष, पालघर जिल्हा महिला आघाडी), सुरेखा नम (ज्येष्ठ कार्यकर्त्या), हर्षाली धानवा (पालघर तालुका महिला आघाडी, अनुसूचित जमाती सेल), पूजा केवट (संघटिका, पालघर शहर), अंकिता जाधव, रुणाली जाधव, मनिषा जाधव, धनश्री जाधव, सुरेखा गायकवाड, प्रियांका तांडेल तसेच राजेश उपाध्याय, दीपेश गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
हा कार्यक्रम महिलांमध्ये सामाजिक जाणीव, एकोपा आणि प्रेरणा निर्माण करणारा ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button