Uncategorized

परुळेकर महाविद्यालयात अविष्कार स्पर्धा एकदिवसीय मार्गदर्शन शिबीराचे यशस्वी आयोजन

परुळेकर महाविद्यालयात अविष्कार स्पर्धा एकदिवसीय मार्गदर्शन शिबीराचे यशस्वी आयोजन 

 तलासरी (प्रतिनिधी)

तलासरी येथील कॉम. गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तलासरी येथे पदार्थविज्ञान विभागामार्फत प्रथम वर्ष विज्ञान आणि द्वितीय वर्ष विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ स्तरीय अविष्कार स्पर्धेसाठीच्या पूर्वतयारीसाठीचे एकदिवसीय मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीराचे नियोजन करण्यात आले होते. दैनंदिन आयुष्यातील विज्ञान-तंत्रज्ञान, संशोधनाचे महत्व,  अविष्कारसाठीची नियमावली आणि विद्यापीठ स्तरीय विज्ञानमहोत्सवाबाबत विविध विषयांतर्गत माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. डॉ. अनिल गायकवाड, प्रा. रितेश हटकर आणि प्रा. पवन काळबांडे आदींनी विद्यार्थ्यांना पोस्टर प्रेझेन्टेशन आणि मॉडेल प्रेझेन्टेशन, विषय निवड, त्याचे योग्य सादरीकरण आणि ह्याद्वारे साधला जाणारा विविधांगी विद्यार्थीविकास ह्याबाबत मार्गदर्शन केले. शिबिरासाठी विज्ञान विभागातील एकूण 61 विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि आभारप्रदर्शन डॉ. अनिल गायकवाड यांनी केले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृष्णा कालात यांचे साहाय्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button