Uncategorized

बहुचर्चित सफाळे पुर्व रेल्वे स्टेशन लिफ्टचे डॉ. हेमंतजी सवरा यांच्या हस्ते व मान्यवरांचा उपस्थित उदघाटन संपन्न.

बहुचर्चित सफाळे पुर्व रेल्वे स्टेशन लिफ्टचे डॉ. हेमंतजी सवरा यांच्या हस्ते व मान्यवरांचा उपस्थित उदघाटन संपन्न*

१४ नोव्हेंबर 

सफाळे ( एच लोखंंडे ) सफाळे पुर्व परिसरातील प्रवासी यांना रेल्वे प्लॅटफॉम १ व २ नवर जाण्या येण्यासाठी बाधलेला लांबलचक पादचारी ब्रिज वरून जाणे येणे हे प्रवासी आणि जेष्ठ नागरिक यांना त्रासदायक ठरू लागला, यामुळे स्थानिक नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी हे रेल्वे प्रशासना निदर्शनास आणून दिल्यानंतर रेल्वे प्रशासनाने आणि मा.डाॅ. हेमंतजी सावरा – खासदार पालघर लोकसभा यांनी D. F. C. C. I. L. / I. R. आणि M. R. V. C यांच्या कडून नियोजन करून, सफाळे पुर्व भागातील प्रवासी यांना रेल्वे ओव्हर ब्रीजवर सोईस्कर रित्या जाण्यायेण्यासाठी लिफ्ट मागणी केली. वती मान्य करण्यात आलेली. अशा बहुचर्चित लिफ्टचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी   मा. डाॅ. हेमंतजी सावरा खासदार यांच्या हस्ते व मान्यवरांचा उपस्थित करण्यात आला. आता सफाळे पुर्व भागातील प्रवासी, जेष्ठ नागरिक महिला यांना रेल्वे प्लॅटफॉम वर जाण्यायेण्यासाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.यापुढेही डॉ. हेमंत सावरा साहेब आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, यांनी सांगितले सफाळेकरांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी  आम्ही नेहमीच आपल्या सोबत आहोत.

    या लोकार्पण व उद्घाटनासाठी आलेले मान्यवर डॉ.हेमंतजी सावरा खासदार साहेब यांचा १४ नोव्हेंबर हा वाढदिवस असल्याने, यानिमित्ताने उपस्थित मान्यवर श्री.प्रविण राऊत सफाळे – जेष्ठस सामाजिक कार्यकर्ते, सौ. मनिषाताई निमकर,- माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, श्री भरत काळे – सामाजिक कार्यकर्ते सफाळे, सौ. शांतता पाटील, श्री.सिकंदर शेख (S.K.)    सफाळे पुर्व आणि पश्चिम विभात असलेल्या ग्रामपंचायती सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सफाळे रेल्वे स्टेशन विभागातील व्यापारी मंडळी, रेल्वे प्रवासी संघटना पदाधिकारी, सफाळे कृती समितीचे पदाधिकारी स्थानिक नागरिक / महिला तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते  यांच्या समक्ष, व्यासपीठावर खासदार हेमंत जी सावरा साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते केक कापून वाढदिवसा साजरा करण्यात आला.

           सफाळे परिसरातील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, रुग्ण आणि दिव्यांग प्रवाशांसाठी या लिफ्टचे उद्घाटन मोठी सोय ठरेल. विशेषत: सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी लिफ्ट सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. असे प्रवासी यांचें सांगणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button