Uncategorized

अखिल भारतीय आदिवासी पत्रकार संघटनेकडून तलासरी येथे पत्रकार दिन समारंभ संपन्न

अखिल भारतीय आदिवासी पत्रकार संघटनेकडून तलासरी येथे पत्रकार दिन समारंभ संपन्न
“जेष्ठ पत्रकार अच्युत पाटील,व शौकत शेख यांचा सत्कार”


८ जानेवारी
पालघर ( नितीन बोंबाडे ) दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी अखिल भारतीय आदिवासी पत्रकार संघटनेच्या वतीने आद्य पत्रकार दर्पणकार “स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर” यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन, कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालय, तलासरी (पूर्व), जिल्हा पालघर येथे उत्साहात संपन्न करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार श्री.अच्युत पाटील आणि श्री. शौकत शेख यांचा सत्कार आमदार विनोद निकोले आणि ज्येष्ठ पत्रकार संजीव जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना जेष्ठ पत्रकार श्री. संजीव जोशी यांनी पत्रकारांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून सामाजिक बांधिलकी जपावी, असे मत व्यक्त केले. यावेळी नवीन पत्रकारितेचे विद्यार्थी तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष, मा. श्री. विनोद निकोले आमदार डहाणू विधानसभा यांनी सांगितले, पत्रकार यांनी समाजातील वंचित घटकांचा आवाज बनत निर्भीड व सत्य पत्रकारिता करावी, असे आवाहन केले. याकार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर डॉ. भगवान राजपूत (प्राचार्य, कॉम्रेड गोदावरी परुळेकर महाविद्यालय, तलासरी) उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक, ज्येष्ठ पत्रकार ॲड. संजीव जोशी यांनी पत्रकारांना यांनीही आपल्या परिने मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून तलासरी पोलिस ठाणे प्रभारी पोलिस अधिकारी श्री. अजय गरोडा पो . निरीक्षक, तसेच प्रा. भास्कर गोतीस (केंद्र संयोजक, वायसीएमओयू, तलासरी) यांनी उपस्थितांना संबोधित केले.
कार्यक्रमात संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सुधीर घाटाळ यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. तसेच सुधीर घाटाळ आणि अरविंद बेंडगा यांनी विद्यार्थ्यांना पत्रकारितेतील संधी, जबाबदाऱ्या आणि सामाजिक भान याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव नितीन बोंबाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संपर्कप्रमुख प्रवीण चव्हाण यांनी मानले. या वेळी संघटनेचे खजिनदार सुरेश वाळवी, उपाध्यक्ष सत्येंद्र मातेरा व तुलसीराम चौधरी, सहसचिव वीरेंद्र खाटा व जितेंद्र टोके, सहखजिनदार महेश भाये, सदस्य माधव तल्हा यांच्यासह शैलेश तांबडा, भरत पुंजारा, गोविंद गावित, संदीप राऊत, संदीप थोरात, देवूभाई भोया, अश्रफ खान, संतोष ठाकरे, संतोष भावर, गंगाराम वारंगडे आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.अखिल भारतीय आदिवासी पत्रकार संघटनेच्या या पत्रकार दिन समारंभाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button