Uncategorized

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतही ‘ज्ञानमाता झरी’ शाळेची चमकदार कामगिरी

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतही ‘ज्ञानमाता झरी’ शाळेची चमकदार कामगिरी

तलासरी, दि. १० (डॉ. दत्तात्रय शिंदे)
आदिवासी विकास विभागातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच दि. ५ ते ७ जानेवारी रोजी हनुमान प्रसारक व्यायाम मंडळ ,अमरावती येथे संपन्न झाल्या. ठाणे विभागाचे नेतृत्व करताना अतितटीच्या व चुरशीच्या झालेल्या विविध स्पर्धांमध्ये ज्ञानमाता झरी आश्रम शाळेतील २१ खेळाडूंनी आपल्या क्रीडा कौशल्याची चुणूक दाखवून प्रशंसा मिळविली.
१९ वर्षे वयोगटात किरण नाईक यांनी १०० मीटर धावणे द्वितीय क्रमांक पटकावला. ४बाय १०० मी. रिले प्रकारात सहभागी असलेले किरण नाईक, अतुल धांगडा ,राहुल दळवी व स्नेहल कोंढारी यांनी ठाणे विभागाला सुवर्णपदक पटकावून दिले.आरती वरखंडे हिने ३ हजार मीटर धावणे प्रकारात ब्राॅझ पदक मिळविले. ठाणे विभागाच्या कबड्डी संघात असलेल्या अमोल अंधेर व वैभव वावरे यांनी तृतीय क्रमांक मिळवताना उल्लेखनीय कामगिरी केली. १४ वर्ष वयोगटातील कबड्डी संघात असलेल्या प्रणव वरखंडे प्रितेश वढाणे व अनवेश वळवी यांनी ठाणे विभागाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. ४ बाय १००मी. रिले प्रकारात सहभागी असलेल्या रोशन बारगा, तेजस गवळी, राहुल धांगडा यांनी सिल्व्हर पदक मिळवले. १४वर्ष वयोगटात रोशन बारगा यांने ६००मी.धावण्याच्या स्पर्धेत ब्राॅझ पदक मिळवले.सतरा वर्ष मुलींच्या कबड्डी संघात असलेल्या संस्कृती उराडे हिने ठाणे विभागाला उपविजेतेपद पटकावून देण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी केली.
विद्यालयाच्या प्राचार्या सि. बस्तियाना फर्नांडिस यांचे मार्गदर्शन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी घेतलेली मेहनत, ज्ञानमाता सदन संस्थेचे संचालक फा. निलम लोपीस व शाळा संचालक फा.सॅबी कोरिया यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे व पालकांच्या सर्वतोपरी सहकार्यामुळेच विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या क्रीडा यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button