Uncategorized

विद्यार्थी गुणगौरव व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

विद्यार्थी गुणगौरव व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
पालघर (प्रतिनिधी)
कुणबी समाजाचे सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभाग व आयोजित विद्यार्थी गुणगौरव व मार्गदर्शन कार्यक्रम ग्रामीण विभाग शिक्षण संस्थेचे स्व. सौ. विद्या विनोद अधिकारी विद्यालय. लालोंडे सभागृह येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे व सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे अध्यक्ष प्रशांत सातवी यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात युवक मंडळाचा आढावा घेत वर्षभर समाजपयोगी करीत असलेल्या कार्याचा आढावा घेतला. रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्याचे वाटप, विद्यार्थी गुणगौरव, महिला मिळावे, आरोग्य शिबिर, कला क्रीडा महोत्सव, आदी कार्यक्रम घेऊन समाज बांधवांना विशेष संधी व मदत करण्याचा प्रयत्न मंडळ करीत आहे .
या कार्यक्रमाचे उद्घाटक अँड. प्रणव अशोक सूर्यवंशी, विशेष अतिथी भालचंद्र पाटील, सुनील शेलार, चंद्रशेखर नाईक, विशेष निमंत्रित मार्गदर्शक कुणाल ठाकूर, प्रमुख पाहुणे अँड. प्रणय घरत, प्रमुख मार्गदर्शक प्रा. संजय घरत उपस्थित होते.
‘ अभ्यासाचे तंत्र आणि मंत्र ‘ या विषयावर प्रा. संजय घरत यांनी दहा मुद्दे घेऊन उदाहरणासह बहुमोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाची पद्धत, प्रार्थना, व्यायाम, संभाषण, मनोरंजन, मनन व चिंतन, वेळापत्रक, आहार व स्वच्छता, झोप, दृढनिश्चय या तंत्र व मंत्राचा वापर केला तसेच आपल्याकडे असलेल्या कौशल्याचा वापर केला तर विद्यार्थ्यांना आपल्या भावी काळात यश संपादन करण्यास मोठा हातभार लागेल.
या कार्यक्रमाला नेहमीच सहकार्य व हातभार लावणारे विशेष निमंत्रित दाते माननीय मनोज विनोद अधिकारी, यदुनाथ पाटील, मार्तंड पाटील, अविनाश पाटील, चेतन पाटील, उल्हास सातवी, मनोज ठाकूर, दिनेश पाटील, अमित पाटील, मुकेश पाटील, अलंकार सातवी, हितेश पाटील, योगेश पाटील, यतीन पाटील, विद्यार्थी, पालक, शिक्षक, समाजबांधव, बंधू-भगिनी, मंडळाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वैभव नारायण पाटील यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button