दैनिक “रायगड स्वाभिमान”तृतीय वर्धापन दिन साजरा रोहा येथे

दैनिक “रायगड स्वाभिमान”तृतीय वर्धापन दिन साजरा रोहा येथे!
मुंबई प्रतिनिधी: (सतीश पाटील)
निर्भीड निःपक्ष दैनिक “रायगड स्वाभिमान वृत्तपत्राचा”
तृतीय वर्धापन दिन रोहा येथे मोठ्या उत्साहात संपन्न ..! “पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कोंकणरत्न पत्रकार कैलासराजे घरत यांना सन्मानित करण्यात आले.”
“तृतीय वर्धापन दिन, दिनदर्शिका प्रकाशन, गुणगौरव सोहळ्याचे आयोजन”
दै.रायगड स्वाभिमान या वृत्तपत्राचा तृतीय वर्धापन दिनाचा भव्यदिव्य कार्यक्रम सोहळा रविवार दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत रोहा तांबडी रोड, श्रीकृष्ण हाॅटल व फॅमिली गार्डनमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्रीगणेशाच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक म्हणून राज्य माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री सुभाषजी बसवेकर सर, नायब तहसीलदार रोहा मा.श्री.राजेश थोरे साहेब, संविधान जनजागृती व अभ्यासक मा.जनाब नुरखा पठाण, व्हॉईस ऑफ मिडियाचे कोंकण विभाग अध्यक्ष मा.अरुण ठोंबरे, आयुर्वेदिक सल्लागार आरोग्य बेरोजगार समस्या मार्गदर्शक मा.प्रदीपजी भेकरे, माजी नगरसेवक उद्योजक मा.दिपकशेठ तेंडुलकर, कृषितज्ज्ञ मांडवकर साहेब
यांचा मायेची उबदार शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रायगड स्वाभिमान दिनदर्शिका-२०२६ प्रकाशन करण्यात आले. तदनंतर रायगड स्वाभिमान वृत्तपत्राचे प्रतिनिधी पत्रकार कैलासराजे घरत यांनी तृतीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने कविता सादर केली आणि आपले मनोगत व्यक्त केले. मुख्य संपादक श्री रघुनाथ कडू साहेब यांनी मार्गदर्शनपर प्रास्ताविक सादर केले आणि सर्वांना तृतीय वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सकाळच्या सत्रात श्री प्रदीपजी भेकरे साहेब यांनी आज प्रत्येक व्यक्तीला भेडसावणाऱ्या रोजगार आणि आयुष्याच्या समस्या, या विषयांवर उपाय आणि इलाज म्हणून निरोगी आयुष्य व आयुर्वेदाचे महत्त्व फार सोप्या भाषेत समजावून सांगितले. मा.श्री.राजेश थोरे साहेब नायब तहसीलदार रोहा यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. भारतीय संविधानाचे गाढे अभ्यासक तथा आमचे मार्गदर्शक श्री नुरखा पठाण साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार मिळाले. भारतीय संविधान उद्येशिका सामूहिक वाचन करण्यात आले.
त्यानंतर उपस्थितांनी उत्तम स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. दुपारच्या सत्रात श्री सुभाषजी बसवेकर सर यांनी माहिती अधिकार कायद्याबद्दल आपले विचार मांडताना आपले वयक्तिक आयुष्यातील उदाहरणांसहीत सुलभ सोप्या भाषेत माहिती दिली. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक, पत्रकारिता, शैक्षणिक, क्रीडा, कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय काम करुन नावलौकिक मिळविलेल्या ४० व्यक्तिमत्वाचा गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्माचिन्ह आणि आरेका पाम झाड देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सर्व उपस्थित असलेल्या पत्रकार सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, संपादक, उपसंपादक आणि प्रमुख अतिथी याचे पत्रकार कैलासराजे घरत यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले. सामूहिक राष्ट्रीय गीत वंदे मातरम् घेऊन या कार्यक्रमाची गोड सांगता करण्यात आली.
रायगड स्वाभिमानचा आवाज चांदापासून बांधापर्यंत पोहचला आहे. रायगड स्वाभिमान तळागाळातील कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज आहे. त्याबद्दल मुख्य संपादक सन्माननीय श्री.रघुनाथ कडू सर, आणि उपसंपादक कु. रोहन रघुनाथ कडू सर प्रत्येक पत्रकारांच्या मागे खंभीरपणे उभे राहणारे दोन्ही व्यक्तिमत्व आहे.
पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपण्याचे काम, अन्यायाविरुद्ध लढण्याचे काम, सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविण्याचे काम रायगड स्वाभिमान वृत्तपत्र करत राहिला आहे.
कोरोना काळात रुग्णांची घेतलेली काळजी उल्लेखनीय आहे. या बिकट संकटकाळी परिस्थितीत रुग्णांना मानसिक बळ देण्याचे काम प्रतिनिधींनी केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी रायगड स्वाभिमान उपसंपादक रोहन कडू सर, सहसंपादक श्री.अरविंद मगर, आवृत्ती संपादक किरण मोरे सर्व पत्रकार प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी विकास प्रतिष्ठान रोहा, तालुका अध्यक्ष श्री गणेश भगत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महाराष्ट्रातील २८० पेक्षा जास्त प्रतिनिधी पत्रकार या रायगड स्वाभिमान वृत्तपत्रास जोडले गेले असून आजच्या कार्यक्रमास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उत्स्फूर्तपणे १२५ ते १५० च्या पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष टेंबे यांनी केले. अतिशय संस्मरणीय असा हा वर्धापन दिन साजरा झाला. पत्रकार : कैलासराजे घरत यांना दिली.