Uncategorized

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा

.तलासरी (प्रतिनिधी)

कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच मार्फत राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला . सर्वप्रथम महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. बी ए राजपूत, सहाय्यक प्राध्यापक दिपक वाकडे , कार्यक्रम अधिकारी. सचिन राऊत आणि शेफाली गहला तसेच 75 स्वयंसेवक उपस्थित होते . मुंबई विद्यापीठाचे एनएसएस गीत विद्यार्थ्यांना डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून दाखविण्यात आले .
सहाय्यक प्राध्यापक दिपक वाकडे यांनी यांनी मार्गदर्शन करताना एन.एस.एस मध्ये भूतकाळातील आठवणी तसेच एनएसएस का महत्त्वाच आहे , एनएसएस ची उद्धिष्ट्ये या संदर्भात उपस्थित स्वयंसेवकांनी प्रबोधन केले .
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. बी ए राजपूत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन एन.एस.एस मध्ये जास्तीत जास्त सामाजिक काम करण्यासंदर्भात प्रोत्साहित केले . सदर कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगीताने झाली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button