निवृत्त पेंशनर कामगारांच्या व्यथा.. भेदभाव का?

निवृत्त पेंशनर कामगारांच्या व्यथा.. भेदभाव का?
[कमीत कमी पेंशनची अपेक्षा.]
केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्यांच्या अनेक लोकोपयोगी योजना सामान्य लोकांसाठी कार्यान्वित आहेत, नक्कीच शासनाच्या ह्या लोकोपयोगी योजना चांगल्या असतात आणि आहेत. तथापि निवृत्त होऊन घरी असलेल्या कामगारांना आपल्या आयुष्याच्या उंबरठ्यावर जगण्यासाठी मिळणारे पेंशन अगदीच तुटपुंजे मिळते/ दिले जाते अशा ह्या कामगारांकडे कुठेतरी काही अंशी दुर्लक्ष होत आहे असे वाटते.
जरी ह्या कामगारांनी घरातील सर्व सुखसोयी बाजूला ठेवून समजा वडापाव खाऊन जगायचे झाले तरी एकावेळी फक्त एक वडापाव खाल्ला,साधा कटींग चहा प्यायला किंवा मोजकाचा पाणी प्यायला तरी महिण्याचा खर्च खालील प्रमाणे होतो.
🟣 एका माणसाचा जगण्यासाठी ढोबळ खर्च
१५.०० रूपये एक वडापाव
०५.०० रूपये एक कटिंग चहा
१०.०० रूपये पाणी
३०.०० रूपये एक वेळ
६०.०० रूपये सकाळ/संध्याकाळी
🟣 महिन्याचा एकुण खर्च
६०.०० × ३० दिवस
= १८००.०० रूपये
ह्या प्रमाणे महीन्याचे ३० दिवसाचे १८०० रुपये होतात. आणि हे साधताना सर्व गोष्टी बाजूला ठेवून आणि घरदार सोडून आकाशातील वातावरणात रहावे लागेल जसे की
🟦राहण्यासाठी घर
🟦लाईटबील
🟦घरपट्टी
🟦गॅस/चुल
🟦कपडेलत्ते
🟦जेवण तयार करण्याचे सामान
हे सर्व काही कमीत कमी मिळणाऱ्या ह्या तुटपुंज्या १०००/१५०० रुपये पेंशन मध्ये साधू शकणार आहे का? साधू शकणार नाही.
पेंशन घेणाऱ्या हया कामगारांनी आपल्या नोकरी दरम्यान पेंशन मिळावी म्हणून सरकार दरबारी (इपिएफओ कडे) काही रक्कम जमा केलेली आहे आणि ही रक्कम देशाचा विकास व्हावा म्हणूनच काही अंशी हातभार लावलेला आहे त्यात त्यांनी सरकारी आणि खाजगी असा भेदभाव केलेला नाही परंतु आज येथे सरकारी आणि खाजगी कामगारांना मिळणाऱ्या
पेंशन मध्ये तफावत/भेदभाव दाखवला जात आहे. केंद्रीय आणि राज्य सरकारी कामगारांना महागाई भत्ता नुसार पेंशन सुद्धा वाढवून मिळत असते परंतु खाजगी आस्थापना मध्ये कामगार सर्व नियमानुसार पेंशनची रक्कम दरमहाच्या आपल्या पगारातून जमा करत असते अगदी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न पाहता. अस ऐकण्यात आले होते की जास्तीचे पेंशन हवे असेल त्यांनी अधिकची रक्कम भरावी परंतु ज्यांना ह्या मिळणाऱ्या पेंशनवर जगणे कठीण आहे तो कामगार अधिकची रक्कम कशीकाय भरू शकेल?
अपेक्षा आहे खाजगी कामगारांनाही पेंशन बाबतीत योग्य न्याय मिळेल आणि कमीतकमी ५००० रूपये तरी दरमहा पेंशन मिळेल.अपेक्षा आहे येणाऱ्या काळात शासन निवृत्त झालेल्या कामगारांबद्दल सकारात्मक निर्णय घेईल.
प्रतिक्रिया
महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना अमलात आणल्या गेल्या आहेत. त्यातील लाडकी बहीण अंतर्गत दरमहा १५००/-दिले जातात, नक्कीच ही गरजू महिलांना साठी चांगली योजना आहे. तथापि अनेक वर्षांपासून आपल्या दरमहाच्या पगारातून आयुष्याच्या अखेरच्या दिवशी पेंशन रूपी काही रक्कम सरकार मान्यता इपिएफओ कडे जमा केलेली असते त्या कामगारांना जगण्यासाठी किमान पेंशन मिळावे ही कळकळीची नक्कीच ही विनंती आहे. ज्याची जाणिव आपणा सर्वांना आहे.. असणारच.
— दयानंद पाटील
मायखोप, केळवे रोड