Uncategorized

दापोडे, मानकुली नाका (भिवंडी) भीषण अग्नीतांडव

दापोडे, मानकुली नाका (भिवंडी) भीषण अग्नीतांडव

मुंबई प्रतिनिधी:(सतिश पाटील)
भिवंडी, मानकुली नाका, दापोडे पाईपलाईन, पेट्रोल पंप शेजार हरीहर इंडस्ट्रियल इस्टेट
पत्ते बेल्ट आणि ट्रॉफ्या असे उत्पादन होत होतेनमस्कार…
आताची सर्वात मोठी बातमी भिवंडीहून समोर येतेय…
भिवंडी तालुक्यातील मानकुली परिसरात असलेल्या भीषण आग लागली असून आगीने अक्षरशः तांडव केलं आहे.
आगीचे प्रचंड लोळ आकाशात झेपावताना दिसत असून, संपूर्ण परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं आहे.
प्राथमिक माहितीनुसार, औद्योगिक परिसरातील एका गोदामाला ही आग लागली असून आग वेगाने इतर युनिट्सकडे पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच भिवंडी, कल्याण आणि ठाणे येथून अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
या आगीत नेमकं किती नुकसान झालं आहे किंवा जीवितहानी झाली आहे का, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील कामगार आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून, शॉर्ट सर्किटचा संशय व्यक्त केला जात आहे.
या भीषण आगीबाबतचे अधिक तपशील आम्ही तुम्हाला सातत्याने देत राहू,,,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button