निवडणूक अधिकारी प्रांत श्याम मदनुरकर यांची सविस्तर मुलाखत

निवडणूक अधिकारी प्रांत श्याम मदनुरकर यांची सविस्तर मुलाखत
(नियम, अटी व खर्चाची मर्यादा समवेत)
पालघर : ,(प्रतिनिधी)आगामी नगरसेवक व नगराध्यक्ष निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक अधिकारी प्रांत श्याम मदनुरकर यांनी आज पत्रकाशी संवाद साधत नागरिक, उमेदवार आणि राजकीय पक्षांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. मतदानाबाबतचे आवाहन, निवडणूक नियम व खर्च मर्यादा याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली.
मतदान सर्वांनी करावं – मदनुरकर यांचं आवाहन
मदनुरकर म्हणाले,
“लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक मतदाराने घरातून बाहेर पडून मतदानाला प्राधान्य द्यावे. मतदान हा तुमचा हक्कच नाही, तर जबाबदारीही आहे.”
ते पुढे म्हणाले की मतदान प्रक्रिया सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. युवक, महिला व नवमतदारांनी विशेषतः उतरून मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
निवडणूक नियम व आचारसंहिता – उमेदवारांनी काटेकोर पाळावी
मदनुरकर यांनी निवडणूक नियमावलीबाबत उमेदवारांना स्पष्ट सूचना दिल्या :
कोणत्याही प्रकारची गैरवर्तणूक, पैसेवाटप, दारूवाटप, धमकावणे किंवा आकर्षण निर्माण करणे प्रतिबंधित आहे.
प्रचाराची साधने, ध्वनिक्षेपक, बॅनर, पोस्ट,वाहने याबाबतच्या वेळा व परवानग्या काटेकोरपणे पाळाव्या.
प्रचारादरम्यान वाहतूक, शांतता आणि सामाजिक सौहार्द राखणे अनिवार्य आहे.
सोशल मीडियावर खोटे संदेश, दिशाभूल करणारी माहिती पसरविणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई केली जाईल.
उमेदवारांच्या खर्च मर्यादेबाबत स्पष्ट माहिती
निवडणूक अधिकारी मदनुरकर यांनी नगरसेवक व नगराध्यक्ष उमेदवारांच्या खर्च मर्यादाही स्पष्ट केल्या :
1) नगरसेवक पदासाठी खर्च मर्यादा : नगराध्यक्ष पदा साठी खर्च ₹ 1100000=2,) व नगर सेवक पदा साठी
₹350000… रुपये पर्यंत मर्यादा आहे.
प्रचार साहित्य, सभा, सोशल मीडिया जाहिरात, वाहन भाडे यांचा तपशील खर्च खात्यात दाखवणे बंधनकारक.
प्रत्येक खर्चाचे बिल उमेदवाराने जतन करणे आणि निवडणूक विभागाकडे वेळेत जमा करणे आवश्यकते पेक्षा
कायदेशीर खर्चापेक्षा जास्त खर्च आढळल्यास उमेदवारी रद्द करण्याची तरतूद.
नागरिकांनी भीती न बाळगता मतदान करा – मदनुरकर
“मतदान केंद्रात सुरक्षा व्यवस्था मजबूत आहे. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा आहेत. कोणत्याही तक्रारीसाठी हेल्पलाईन कार्यरत आहे,” असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला.
शेवटी त्यांनी दिलेला संदेश.२ डिसेंबर रोजी मतदान, व ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
“पालघर जिल्ह्यातील प्रत्येकाने मतदानाकरिता घरातून बाहेर पडावे. तुमचा एक एक मत हे शहराच्या पुढील पाच वर्षांच्या विकासाचा मार्ग ठरवेल.”