तलासरी महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त ‘मानवी साखळी’ आणि उद्देशिकेचे वाचन!

तलासरी महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त ‘मानवी साखळी’ आणि उद्देशिकेचे वाचन!

तलासरी (प्रतिनिधी)
आदिवासी प्रगती मंडळ संचालित कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तलासरी येथे संविधान दिनानिमित्त प्राचार्य डॉ. भगवानसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनातून राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा संविधान दिन साजरा करण्यात आला.
संविधानाचे महत्त्व, उद्देशिकेचे वाचन व मानवी साखळी
अश्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
संविधान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मानवी साखळीचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्त्व सांगणाऱ्या पोस्टर प्रदर्शनात देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
आजच्या कार्यक्रमां चे प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्राची झिमरे मॅडम यांनी संविधानातील महत्त्वपूर्ण कलमे आणि
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जमाती प्रवर्गाला दिलेले हक्क, संधी आणि संविधानिक संरक्षणाचे महत्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
प्रा. गोतीस सर यांनी वन हक्क कायदा (Forest Rights Act), पेसा कायदा (PESA Act), कुळ कायदा (Tenancy Act) यांसारख्या महत्त्वपूर्ण कायद्यांवर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर. एन. पवार सर यांनी विद्यार्थ्यांना घटनेचे जीवनातील महत्त्व यावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. आर. एन. पवार सर, ग्रंथपाल डॉ. होन सर, मार्गदर्शक डॉ. प्राची झिमरे मॅडम, एन.एस.एस. विभाग प्रमुख डॉ. राऊत सर, प्रा. गहला , प्रा. गोतीस सर, डॉ. माळी सर, प्रा. गावित मॅडम, प्रा. रोझरिओ सर, प्रा. डोल्हारे सर आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी एकूण २११ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.