पालघरमध्ये भाजपातील अंतर्गत कलहाचा व्हिडिओ व्हायरल; भाजपा चे पदाधिकारी अशोक अंबुरे यांच्यावर आणि त्यांच्या पत्नींच्या उमेदवारीवर पडणार परिणाम? पालघर मध्ये ह्या व्हिडिओ मुळे भाजपाच्या निवडणुकीवर परिणाम होणार का?
पालघरमध्ये भाजपातील अंतर्गत कलहाचा व्हिडिओ व्हायरल; भाजपा चे पदाधिकारी अशोक अंबुरे यांच्यावर आणि त्यांच्या पत्नींच्या उमेदवारीवर पडणार परिणाम? पालघर मध्ये ह्या व्हिडिओ मुळे भाजपाच्या निवडणुकीवर परिणाम होणार का?
पालघर (प्रतिनिधी)
पालघर │ पालघर नगर परिषद निवडणूक रंगात आली असताना भाजपमध्ये अंतर्गत कलहाचे वादळ उठले आहे. भाजपचे पदाधिकारी अशोक अंबुरे आणि पक्षात काही महिन्या पूर्वीच पक्ष प्रवेश केलेल्या वैशाली चव्हाण यांच्यात झालेल्या धक्काबुककीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओनंतर पालघरच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.
व्हिडिओमध्ये धक्काबुककीसारखी परिस्थिती दिसत असल्याचे सांगितले जात असून, या संपूर्ण गोंधळात अंबुरे यांच्या पत्नी — अश्विनी अंबुरे ज्या भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार आहेत — त्या देखील उपस्थित असल्याचे दृश्यात दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र या प्रकाराबाबत दोन्ही बाजूंनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
निवडणूक प्रचारात खळबळ
निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये झाला असल्याचे सांगितला जाणारा हा वाद पक्षाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो आहे.
विरोधकांनी या व्हिडिओचा मुद्दा उचलत भाजपवर टीकेची झोड उठवली असून, पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण दिसत आहे.
उमेदवारीवर परिणाम होण्याची चर्चा
राजकीय तज्ज्ञांच्या मते,
“अशा घटना निवडणुकीच्या काहीच दिवस आधी घडल्यास उमेदवारांच्या प्रतिमेवर थेट परिणाम होण्याची शक्यता असते. विशेषतः महिलांशी संबंधित वाद असल्यास प्रतिक्रिया आणखी तीव्र असू शकते.”
अशोक अंबुरे ह्यांच्या पत्नींच्या उमेदवारीवर या प्रकरणाचा काही परिणाम होणार का?, पक्ष उच्चस्तरीय बैठकीत यावर काही निर्णय घेणार का ? की ह्या व्हिडिओ मुळे भाजपा च्या उमेदवारावर परिणाम होईल का?— याबाबत जनतेत चर्चा सुरु आहे.
पक्षाच्या प्रतिमेला धक्का?
भाजपमध्ये कार्यकर्त्यांमधील हा वाद उघड झाल्याने
• पक्षातील अंतर्गत गटबाजी
• नवीनच काही महिन्या पूर्वी प्रवेश घेतलेल्या वैशाली चव्हाण शिस्तभंगाची कारवाई का? अश्विनी अंबुरे ह्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार का?शिस्त भागाचे नियम
या सर्व मुद्द्यांवर आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर हा व्हिडिओ पोहोचला असून, काही स्थानिक नेते शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सूत्रांकडून समजते.
पुढील कारवाईकडे लक्ष
भाजपकडून काय भूमिका मांडली जाईल?
उमेदवारांवर कोणती शिस्तभंगात्मक कारवाई होईल का?
की हे प्रकरण निवडणूक दबावातील गैरसमज म्हणून मिटवले जाईल?
संपूर्ण पालघर याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे.