Uncategorized

अमोल पाटील पुन्हा रिंगणात; शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर

अमोल पाटील पुन्हा रिंगणात; शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर

पालघर (प्रतिनिधी): पालघर नगरपरिषद निवडणुकीत शिंदे गटाकडून अमोल पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली असून ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याआधी नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी आपल्या प्रभागात विकासकामांना प्राधान्य देत नागरिकांचा विश्वास जिंकला होता.

नगरसेवक म्हणून कार्यकाळात पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, लाईट सुविधा यांसारख्या मूलभूत कामात त्यांनी विशेष लक्ष दिल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. पुन्हा उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.

यंदाची निवडणूक अधिक चुरशीची होत असताना अमोल पाटील यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे. शिंदे गटाच्या नेतृत्वाकडूनही त्यांना सक्रिय पाठबळ मिळत असून, आपल्या प्रभागाचा विकास आणि अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

निवडणुकीत विविध पक्षांचे उमेदवार मैदानात उतरले असले तरी अमोल पाटील यांच्या पुन्हा उमेदवारीमुळे या वॉर्डात रंगत वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button