एम.के. ज्युनियर कॉलेज, चिंचणी येथे संविधान जागृती प्रश्नमंजुषा – २०२५ चे आयोजन..
एम.के. ज्युनियर कॉलेज, चिंचणी येथे संविधान जागृती प्रश्नमंजुषा – २०२५ चे आयोजन..


पालघर (प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय (माध्य. व उच्च माध्यमिक विभाग) यांच्या पत्रानुसार विद्यार्थांना भारतीय संविधानाची माहिती व संपूर्ण ज्ञान प्राप्त होईल या अनुषंगाने संविधान जागृती प्रश्नमंजुषा २०२५ आयोजित करण्याचे निर्देशित करण्यात आले होते. चिंचणी तारापूर शिक्षण संस्थेच्या मोतीलाल कानजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी या प्रश्नमंजुषा स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये विद्यार्थ्यांनी संविधानाच्या वैशिष्टयांवर आधारित बहु पर्यायी प्रश्न सोडवले. एन.एस.एस.+२ चे स्वयंसेवक विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता. या प्रसंगी के.डी. व एम. के. ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सुनिल बैसाणे यांनी संविधान जागृती प्रश्नमंजुषा २०२५ साठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे चॉकलेट देऊन स्वागत केले आणि संविधान जागृती विषयी अधिक माहिती दिली. उपप्राचार्या संगीता चुरी यांनी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक सुरज आष्टेकर व पर्यवेक्षक दिनकर टेकनर यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रा. अविनाश भामरे, प्रा. चारुशीला बहारे , रा.से.यो.+२ कार्यक्रम अधिकारी प्रा. एकनाथ पाटील या प्रसंगी उपस्थित होते. प्रश्नमंजुषा २०२५ चे समन्वयक प्रा.संजय बहारे हे होते.