Uncategorized

गुरुदेव दत्त ,विरार चा दत्त जयंती सोहळा संपन्न…

गुरुदेव दत्त ,विरार चा दत्त जयंती सोहळा संपन्न…

विरार (प्रतिनिधी) विरार येथील गुरुदेव दत्त ह्या संस्थेचा दत्त जन्मोत्सव सोहळा दी.६ डिसेंबर, शनिवार रोजी मंगलमूर्ती मंदिर ,विरार येथे दुपारी ३ वाजता संपन्न झाला.प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प.चंद्रशेखर अभ्यंकर, लायन राजेश बक्षी उपस्थित होते.अभ्यंकरांनी दत्त गुरु बद्दल निरूपण केले.सुरुवातीला महारती घेण्यात आली.रवींद्र देशपांडे.ह्यांनी शंखनाद् केला आणी शुभेच्छा दिल्या.प्रस्ताविक उदय कडीकर ह्यांनी केले.नंतर सुश्राव्य भजन संध्येचे आयोजन केले गेले.त्यात माला सावडेकर, रश्मी लुकतुके, विद्या पवार, सोनी, किशोर महेंद्रकर,इंद्रजित विर्दी, राजेंद्र शर्मा, गोपाल सिंग, सुभाष बंगेरा, सूर्यकांत कदम, अनुप पुजारी इ.गायकानी सुरेल भजने सादर् केली.प्रा.विजय उमर्जी हे संस्थेचे संचालक असून त्यांनीच सूत्रसंचालन केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुकेश पालकर, वैदेही पालकर, संजीव शेट्टी , उदय कडीकर, विद्या पवार, सुभाष बंगेरा, किशोर महेंद्रकर, अनुप पुजारी ह्यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाची सांगता तीर्थप्रसादाने झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button