सफाळे रेल्वे स्टेशन पुर्व फुट ओव्हर ब्रीज येथे अवैध पार्किंग गाड्यांवर E चलन द्वारे दंडात्मक कारवाई

सफाळे रेल्वे स्टेशन पुर्व फुट ओव्हर ब्रीज येथे अवैध पार्किंग गाड्यांवर E चलन द्वारे दंडात्मक कारवाई
८ डिसेंबर
सफाळे – ( एच लोखंंडे ) सफाळे रेल्वे स्टेशनच्या पुर्वेकडे रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाण्या येण्यासाठी असलेल्या फूट ओव्हर ब्रीज जवळपास आणि असलेल्या मोकळ्या रस्त्यावर दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी, आणि इतर कामासाठी बाजारात येणारे, आपल्या मोटारसायकली अनाधिकृत पणे पार्किंग करून निघून जात असतात. त्यामुळे रेल्वे प्रवासी यांना रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाण्या येण्यासाठी असलेल्या ओव्हर ब्रीज वरून जाण्या येण्यासाठी नागमोडी वळणे घेत मोटरसायकलीना चुकवीत प्लाटफॉमवर जाणे येणे अडचणीचे ठरत आहे. या बद्दल दैनंदिन रेल्वे यांनी स्टेशन मास्तर सफाळे यांच्या कडे याबद्दल अनेकदा नाराजी व्यक्त केली असताना तसेच लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत.
या अनुषंगाने दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान ( RPF ) श्री. हरेंद्र कुमार – कॉन्स्टेबल आणि स्थानिक पोलीस ठाणे सफाळे यांच्या अंतर्गत काम करणारे पालघर ट्राफिक पोलिस अंमलदार श्री.बाबासाहेब यमगार ASI यांनी संयुक्तपणे पहाणी करीत, सफाळे रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाण्या येण्यासाठी असलेल्या रस्त्यांवर व नो पार्किंग क्षेत्रात पार्किंग केलेल्या खालील प्रमाणे नंबर प्लेट असलेल्या एकुण ०७ गाड्यांवर ईचलना द्वारे दंडात्मक कारवाई केली आहे. 1) MH 48-CU – 8016 – Rs. 500 /- 2)MH.04. EG.- 3089 ₹ 500 -/ 3) MH- 48 BB,- 8524 – ₹ 500 -/, 4) MH. 48. -.6460- ₹ 500 -/ 5) – MH.048- X- 91670- ₹ 500 – /. 6 ) M H -04 -CF – 9753 ₹ 500, 7) MH -48-CF 5681- Rs 500/-
ई चलनाद्वारे या ७ मोटरसायकल मालकांनवर दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी दंडात्मक कारवाई करून एकंदर ३५००-/ रूपये वसूल करण्यात आलेला आहे
तसेच यापुर्वीही दिनांक २९ सप्टेंबर ,१ ऑक्टोबर, २०२५ रोजी पालघर रेल्वे सुरक्षा बल हेड कॉन्स्टेबल हरेंद्र कुमार नेमणूक सफाळे रेल्वे स्टेशन यांनी,व पालघर ट्राफिक पोलिस श्री बाळासाहेब मयगार Asi नेमणूक सफाळे पोलिस ठाणे यांनी सफाळे रेल्वे स्टेशन पुर्व नो पार्किंग शेत्रात पार्किंग असलेल्या मोटरसायकल मालकांनवर इ चलनाद्वारे कारवाई केलेली.