गोरेगाव येथे मोफत नाडी परीक्षण व रोग निदान शिबीर संपन्न!

गोरेगाव येथे मोफत नाडी परीक्षण व रोग निदान शिबीर संपन्न!
मुंबई : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्रंबकेश्वर, नाशिक व प.पु. मोरेदादा चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, गोरेगाव पूर्व, विसावा ज्येष्ठ नागरिक संघ, प्लॉट नं. ६, नागरी निवारा परिषद येथे संपन्न झाले.
तज्ञ वैद्यच्या मार्गदर्शनाने व नाडी परीक्षण च्या आधारे, मधुमेह, कॅन्सर, रक्तदाब, साध्याचे, त्वचा, पोटाचे विकार, मुळब्याध, मनोविकार, कावीळ, लहान मुलांचे आजार आदी वर रोगनिदान करुन अल्प दरात औषधे देण्यात आली
आरोग्य तपासनीचे डॉ. चारुशीला पाटील व डॉ. सायली तरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. आरोग्य तापासणीस, विभागातील संतोष नगर, नागरी निवारा वसाहत, गोकुळ धाम, संकल्प सोसायटीतील असंख्य महिला, पुरुष व मुलानी तपासांनी करून घेतली.
श्री स्वामी समर्थ, नागरी निवारा सेवा केंद्राचे श्रीधर कडू, सुनिल पडवळ, स्वामींनी कडू, दीपलक्ष्मी चौधरी, शुगांगी पवार, प्रतिभा घरत, शैलेश गरटे, नेहा पाटील, सोनाली कद्रेकर, रवी मोरे, अनिल रहाटे, व संदीप पवार आदीचे सहकार्य मोलाचे होते.