Uncategorized

33 व्या आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन समारंभाचे सफाळे परिसरात लागले स्वागत फलक

33 व्या आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन समारंभाचे सफाळे परिसरात लागले स्वागत फलक
१२ जानेवारी
सफाळे ( एच. लोखंडे ) दरसाल बादप्रमाणे यावर्षीही आदिवासी सांस्कृतिक एकताचे ३३ वे महासंमेलन हे दिनांक 13, 14 व 15 जानेवारी 2026 रोजी, चैनपुरा, नेपानगर, जिल्हा बुऱ्हाणपूर – मध्यप्रदेश, येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात करण्याचें आयोजित करण्यात आले आहे. या महासंमेलनात आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा – कला- लोकनृत्य- लोकसंगीत यांची जपणूक आणि सामाजिक एकतेचा जागर करण्यात येणार येत असतो.
सदर या महासंमेलनाच्या पार्श्वभूमीची तयारी आणि आदिवासी बांधवात जनजागृती करण्यासाठीं सफाळे परिसरात महासंमेलनाचे स्वागत फलक उभारण्यात आले आहे. सदर महासंमेलनाच्यां लागलेल्या फलकांमुळे सफाळे परिसरात उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून महासंमेलनाची महती- माहिती जंगल पट्टी, बंदर पट्टी व शहरी भागात पोहोचू लागली आहे. तसेच सोशल मीडिया माध्यमांद्वारे—व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम व रील्स यांच्या माध्यमातूनही महासंमेलनाचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
संमेलनाचे स्वागत फलक उभारणीच्या वेळी श्री. काशीराम वरठा, श्री. नितीन बोंबाडे- शिक्षक व पत्रकार, देवराम धांगडा, अविनाश भोईर, सुनील घोष, विनोद सुतार, किसन बोंबाडी, गौरांग सांबरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महासंमेलन यशस्वी करण्यासाठी आदिवासी समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन हि स्वागत फलक लावण्याच्या वेळी उपस्थित मान्यवरांनी केले आहे .पालघर जिल्ह्यातून महासंमेलना साठी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी होणार असून, त्यांना जाण्या येण्यासाठी स्थानिक पदाधिकारी यांनी बस, ट्रॅव्हल्स, खाजगी वाहने तसेच रेल्वे मार्गाचा वापर करण्यात येणार आहे. असे सांगितले जात आहे. यासाठी विभागातील पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधला असे सांगितले जात आहे.
पालघर जिल्ह्यातील पालघर, बोईसर, डहाणू, केळवे, सफाळे, कपासे, वाणगाव, कासा, विक्रमगड, वाडा, जव्हार तसेच जिल्ह्यातील विविध भागांतून आदिवासी बांधव या महासंमेलनात सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी यावेळी दिल्याची माहिती मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button