डहाणू तालुक्यातून १३प्रकल्पाची जिल्हास्तरार निवड



डहाणू तालुक्यातून १३प्रकल्पाची जिल्हास्तरार निवड
तलासरी दि १४(डॉ. दत्तात्रय शिंदे) डहाणू तालुक्यातुन आयोजित विज्ञान प्रदर्शनातून १३ विज्ञान प्रकल्पाची निवड जिल्हास्तरावर करण्यात आली आहे.
तालुक्यातील सेवा विद्यामंदिर आदिवासी हायस्कूल गांगणगाव येथे ५३वे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन १० व ११ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते। सदर प्रदर्शनात माध्यमिक विभागातून ३ आदिवासी विभागातून १ दिव्यांग विभागून १ आणि शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य १ प्रयोगशाळा परिचर १ प्राथमिक विभागातून सर्वसाधारण विभागतून ३ आदिवासी विभागातून ३दिव्यांग विभागून १आणि शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य १ शिक्षकांचे साहित्य १ असे एकूण १३ प्रकल्पांची निवड जिल्हास्तरीय होणाऱ्या प्रदर्शनासाठी करण्यात आली आहे . सदर प्रकल्प हे आपल्या संकल्पनेतून बालवैज्ञानिक यांनी मांडले होते. सदर प्रदर्शनात विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी एस टी इ एम हा प्रमुख विषय होता . यावेळी विद्यार्थ्यांच्या कला गुणांना चालना देण्यासाठी निबंध ,वक्तृत्व ,प्रश्न मंजुषा ,चित्रकला आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या .
सदर बक्षीस वितरण प्रसंगी गटशिक्षणाधिकारी संजय वाघ , शाळेचे प्राचार्य फादर एशली भंगा , फादर सेबी कोरिया, अदानी थर्मल पॉवर प्रकल्पाचे अधिकारी हरिश पांडे ,नित्यानंद तिवारी ,अविनाश फाटक , विज्ञान समन्वय मधु चौधरी, जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष संतोष पावडे, तालुका विज्ञान मंडळ अध्यक्ष शशिकांत ठाकूर आदी या वेळी उपस्थित होते सदर प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक फादर ऍशली भंगा,राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संतोष पावडे,शाळेतील शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी विशेष मेहनत घेतली . प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील विविध शाळांचे विद्यार्थी,पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.माजी विद्यार्थी संघ,महालक्ष्मी ट्रस्ट तसेच आय डी एफ फाउंडेशन मुंबई अणि विज्ञान मंडळ यांनी मोलाचे सहकार्य केले.