Uncategorized

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत चिराग कराटे मार्शल आर्ट प्रशिक्षण संस्थेची दमदार कामगिरी

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत चिराग कराटे मार्शल आर्ट प्रशिक्षण संस्थेची दमदार कामगिरी

बोईसर :(प्रतिनिधी) तारापूर विद्या मंदिर फुनाकोशी शोतोकान कराटे ऑर्गनायझेशन यांच्या वतीने नुकतीच येथे जिल्हास्तरीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पालघर जिल्ह्यातील सुमारे १२५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या स्पर्धेत च्या चिराग कराटे मार्शल आर्ट प्रशिक्षण संस्थेच्या १७ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत एकूण ३४ पदकांची कमाई केली. यामध्ये १३ सुवर्ण, १६ रजत आणि ५ कांस्य पदकांचा समावेश असून संस्थेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले.

काता व कुमीते या दोन्ही प्रकारांत

  • मयंक गोराडे, अर्विक तिवारी, शौर्य राऊत, निर्भय पाटील यांनी सुवर्णपदक पटकावले.
  • आरव बाजपेयी, रूपम चौधरी, अर्णव राऊत, तुषार देसाई यांनी सुवर्ण व रजत पदके मिळवली.
  • मनीषा जाधव हिने सुवर्ण व कांस्य पदक जिंकले.
  • कियांश पिंपळे, स्वर्णीत दीक्षित, झयान क्रॉस्टा, आरज्या मंडळ यांनी दोन्ही प्रकारात रजत पदके मिळवली.
  • हर्ष पामाळे याने रजत व कांस्य पदक मिळवले.
  • अमिना शेख व अंश तिवारी यांनी दोन्ही प्रकारात कांस्य पदकांची कमाई केली.

या यशामुळे संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या पदकांची एकूण संख्या २,५५४ वर पोहोचली असून ही कामगिरी अत्यंत नेत्रदीपक मानली जात आहे.

या यशामागे मुख्य प्रशिक्षक व संस्थापक अध्यक्ष राजेश पाटील यांच्यासह चिराग पाटील, निखिल शाह, श्रीकांत राऊत, अर्जुन मलिक आणि ऋत्विक म्हात्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

कराटे प्रशिक्षणाचे वर्ग ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ सभागृह (आयडीबीआय बँकेसमोर) येथे दर सोमवार, बुधवार व शुक्रवार सायंकाळी ६ ते ८ या वेळेत नियमितपणे घेतले जात असून नवीन प्रवेश सुरू असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button