चिराग कराटे मार्शल आर्ट संस्थेच्या ८ विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान


चिराग कराटे मार्शल आर्ट संस्थेच्या ८ विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान
पालघर :(प्रतिनिधी) दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्ह्यातील येथे यांच्या वतीने कराटे क्षेत्रातील उच्च पदवी समजल्या जाणाऱ्या ब्लॅक बेल्ट वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या समारंभात संस्थेच्या आठ विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान करून त्यांच्या मेहनतीचा गौरव करण्यात आला. ब्लॅक बेल्ट प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये समृद्धी कृष्णा डंपलवार, युगल विजय मराठे, ऐशानी आशुतोष शुक्ला, प्रियांक दीपेश राऊत, रुद्र मधुकर दळवी, पराग दत्तात्रय मगर, सिद्धार्थ प्रशांत बाळा यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालघर नगरपालिकेचे नगरसेवक श्री राहुल पाटील, अॅड. दीपक सावळे, यूएस कमांडो रायलॉन क्रॉस्टा, डॉ. संदेश कडू (समाजसेवक) तसेच संदेश नाईक (समाजसेवक) उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेने आतापर्यंत सुमारे १५,००० विद्यार्थ्यांना कराटेचे प्रशिक्षण दिले असून संस्थेच्या खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर १२५ पदके, राष्ट्रीय स्तरावर २,५५४ पदके तसेच १९८ ट्रॉफी पटकावून संस्थेचे नाव उंचावले आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत कराटेमुळे शारीरिक तंदुरुस्ती, आत्मसंरक्षण आणि शिस्तीचे महत्त्व वाढते, असे सांगून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशामागे मुख्य प्रशिक्षक व संस्थापक अध्यक्ष राजेश पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली