Uncategorized

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांगांचा भव्य मोर्चा; २७५ दिव्यांग बांधवांचा सहभाग – विविध मागण्यांवर निवेदन सादर

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांगांचा भव्य मोर्चा; २७५ दिव्यांग बांधवांचा सहभाग – विविध मागण्यांवर निवेदन सादर
पालघर (प्रतिनिधी)
पालघर : प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आंदोलन करून दिव्यांग बांधवांच्या मूलभूत हक्कांसाठी आवाज उठविण्यात आला. या मोर्च्यात तब्बल २७५ दिव्यांग बांधव आणि भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला, ज्यामुळे परिसरात जनजागृतीचे वातावरण निर्माण झाले.

दिव्यांगांसाठी स्थानिक निधीचा थेट वापर करणे, दिव्यांग निराधार योजनेची आय मर्यादा वाढवणे, तसेच सध्या मिळणारी १५०० रुपयांची पेन्शन वाढवून २५०० रुपये देणे, अशा मुख्य मागण्या या आंदोलनातून जोरदारपणे मांडण्यात आल्या.

यासोबतच शासनाच्या GR नुसार २०० स्क्वेअर फूट जागा स्टॉलसाठी तातडीने उपलब्ध करून द्यावी, तसेच दिव्यांगांच्या भावनांचा सन्मान ठेवून त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेल अशा सुधारणा त्वरित राबवाव्यात, अशी मागणीही करण्यात आली.
या सर्व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत नायब तहसीलदार नंदकुमार खोड यांनी स्वीकारले. प्रशासन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

मोर्चाचे नेतृत्व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले. उपस्थित पदाधिकारी :

  1. विलास भोणे – कार्याध्यक्ष
  2. संजय भानुशाली – उपाध्यक्ष
  3. किशोर पाटील – सचिव
  4. बाबू वाल्मिकी – संपर्क प्रमुख
  5. रवी मधड – वसई तालुका अध्यक्ष
  6. विकास कांबडे – विरार/वसई शहर अध्यक्ष
  7. सुनील चुरी – पालघर तालुका अध्यक्ष
  8. सुनिल निपुते – वाडा तालुका
  9. शमीम खान – वसई
  10. राजेश सर – वसई
    दिव्यांगांच्या हक्कांचा लढा तीव्र होत असून पुढील काही दिवसांत प्रशासनाची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button