Uncategorized

पालघर तालुक्यातील केळवे रोड पुर्व झांझरोली डॅम व परिसरात 🐆 बिबट्याचा वावर “सावधानतेचा इशारा”

पालघर तालुक्यातील केळवे रोड पुर्व झांझरोली डॅम व परिसरात 🐆 बिबट्याचा वावर “सावधानतेचा इशारा”


१५ डिसेंबर
सफाळे ( एच लोखंंडे ) केळवा रोड पुर्व ता.जि.पालघर येथील झांझरोली (डॅम) धरण परिसरातील लार पाडा जवळ राहणारे जयसिंग रावते यांच्या घराजवळ बिबट्याने गाईंचे वासरू जखमी केलेले. या घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची भेट देऊन पाहणी केली असून, जखमी वासरूवर प्राथमीक औषधोपचार केले आहे. परंतु धरण परिसरात राहणारे रहिवासी पहाटे, भाजी – पाला आदी घेऊन केळवा रोड बाजारात जाणारे शेतकरी तसेच या परिसरात सकाळी मॉर्निंग वॉक साठी जाणारे, यांच्या वर बिबट्या कडून हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी खात्याने नागरिक यांच्या माहितीसाठी व जागृतते साठी व्हाट्सअप गृप वर मेसेज पाठवले आहेत. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी सुध्दा सुरक्षिततेसाठी उपाययोजना करीत आहेत.
“तरीही परिसरातील सर्व नागरिकांनी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी”
🔹 संध्याकाळनंतर व पहाटे एकटे बाहेर जाऊ नका🔹 लहान मुलांना रात्री बाहेर सोडू नका🔹 शेतात/धरण परिसरात जाताना टॉर्च किंवा लाईट वापरा
🔹 कुत्री, शेळ्या, कोंबड्या रात्री सुरक्षित ठेवा.
❗🐆बिबट्या दिसल्यास घाबरू नका, धावू नका
📞 तात्काळ संपर्क: वनविभाग हेल्पलाईन 1926 व 🚨 आपत्कालीन: 112 संपर्क साधावा.

🙏 कृपया ही सूचना सर्वांना फॉरवर्ड करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button