९७ वर्षांपासून, शिक्षण / देशप्रेम / खेळ / संस्कृती आणि संस्कार, पंचसूत्री कार्य शिकवणारी, पालघर आर्यन शाळा – केदार काळे



९७ वर्षांपासून, शिक्षण / देशप्रेम / खेळ / संस्कृती आणि संस्कार, पंचसूत्री कार्य शिकवणारी, पालघर आर्यन शाळा – केदार काळे
२० डिसेंबर
पालघर ( एच लोखंंडे ) सुमारे ९७ वर्षांपासून आयर्न एज्युकेशन सोसायटी मुंबई. या संस्थेशी संलग्न असलेली पालघर (पश्चिम) ता .जि.पालघर मधील आयर्न एज्युकेशन सोसायटीचे म. नी. हायस्कूल, या शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी सुरू झाला व 20 डिसेंबर 2025 रोजी क्रीडा महोत्सवाची सांगता झाली.
या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या बक्षीस समारंभात आर्यन एज्युकेशन सोसायटी मुंबई या संस्थेचे प्रेसिडेंट श्री. केदार काळे यांनी बोलताना सांगितले, देशप्रेम, शिक्षण, संस्कृती, खेळ व संस्कार हे पंचसूत्री कार्य, आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमध्ये शैक्षणिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात रूजवले जात आहे. या शिक्षण संस्थेच्या व्दारे स्वातंत्र्यापूर्वीपासून देशप्रेम / आपली सुसंस्कृत व भविष्यात सुसंस्कृत नागरिक घडविण्यासाठी संस्कार रूपी शिक्षण देत आहे. शैक्षणिक शिक्षणाबरोबर खेळ, कला संस्कृती यांचेही शिक्षण , संस्थेच्या शाळांमध्ये दिले जाते. हजारो विद्यार्थी पालघर येथील हायस्कूलमध्ये शिकून उच्च दर्जवर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर काही सेवानिवृत्त झाले आहेत. पण अजूनही त्यांचे आपल्या शाळेवरील प्रेम आहे तसेच आहे. या शाळेत शिक्षक घेणारे, तुम्ही भाग्यवान आहात, तुमच्या पालकांनी योग्य निर्णय घेतला. आपण आर्यन शाळेचे विद्यार्थी नव्या युगाचे आर्य कुमार व आर्य कुमारी आहात. काळानुसार शाळा बदलत आहे. 21वे शतकं विज्ञान कॉम्प्युटरचे आहे. यामुळे विज्ञान व तंत्रज्ञान यांचें शिक्षणही शाळेमध्ये विनामूल्य दिले जात आहे.
या वार्षिक क्रीडा महोत्सवात सांघिक व वैयक्तिक अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. मान्यवर यांच्या हस्ते व उपस्थितीत, शेकडो विद्यार्थी यांना बक्षीसे व प्रशस्तीपत्रके देण्यात आली. आर्यन शाळेची विद्यार्थी हे राज्य पातळीवरील खेळात खेळत असून या ( स्टेट लेव्हल ) राज्य पातळीवरील खेळत चमकलेली आहेत.
या कार्यक्रमाला संस्थेचे कार्यवाह श्री जयंत दांडेकर, स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री उपेंद्र घरत, मुख्याध्यापिका सौ.विभूती चौधरी मॅडम, व शिक्षक उपस्थित होते. क्रीडाशिक्षक व वार्षिक क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली. सामने अत्यंत चुरशीने खेळले गेले,. यातून विद्यार्थ्यांमध्ये खेळभावना निर्माण होणार आहे.