Uncategorized

“मुलुंड विधानसभा ग्राहक संरक्षण कक्ष”

“मुलुंड विधानसभा ग्राहक संरक्षण कक्ष

मुंबई प्रतिनिधी : (सतिश पाटील)
मुलुंड विधानसभा ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरघुती वापरातील वायू कुपिका (गॅस सिलेंडर) याच्या संदर्भातील प्राप्त परिस्थितीत होणाऱ्या वितरणाचा आणि सरकारी पुरवठा नियंत्रण आणि ग्राहक सेवा सुरळीत पणे होण्यासाठी दक्षता घेऊन ” प्रसन गॅस कंपनी” मुलुंड पश्चिम तसेच “त्रिमूर्ती गॅस सर्व्हिस” मुलुंड पूर्व येथील मूख्य वितरकांना पत्र देऊन काळाबाजार रोखण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेला वेठीस न धरता सुरळीत सेवा उपलब्ध करून द्यावी लागते माननीय श्री अनिल भाऊ देसाई खासदार,अध्यक्ष ग्राहक संरक्षण कक्ष शिवसेना भवन कार्यालय यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ग्राहक संरक्षण कक्ष कार्यकारिणी आणि श्री अजय जी शिरोडकर साहेब ईशान्य मुबंई समन्वयक ग्राहक संरक्षण कक्ष ह्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रकाश नारायण सावंत (कक्ष विधानसभा संघटक), श्री प्रशांत पाताडे ( कक्ष कार्यालयीन चिटणीस) श्री स्वप्नील गायकवाड (शाखाप्रमुख १०३), श्री हितेश जाधव ( उपकक्ष संघटक) श्री नितिन भोसले (उपकक्ष संघटक) श्री नयन पेडणेकर (विधानसभा प्रसारक) श्री प्रभात बोल्लम (कक्ष संघटक) श्री सतिश बंदरकर (शाखा समन्वयक) उपस्थित राहून
आज दिनांक १६/०३२०२६ रोजी पत्र देऊन समज वजा विनंती करण्यात आली आणि पुढील जनजागृती करण्यासाठी स्थानिक पातळीवर सर्व पदाधिकारी यांना आव्हान करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button