तिकीट चेकिंग परिवार, मुंबईतर्फे हिंदू नववर्ष स्वागत व सन्मान पुरस्कार २०२६ कार्यक्रम

तिकीट चेकिंग परिवार, मुंबईतर्फे हिंदू नववर्ष स्वागत व सन्मान पुरस्कार २०२६ कार्यक्रम
मुंबई :(प्रतिनिधी )तिकीट चेकिंग परिवार, मुंबई यांच्या वतीने हिंदू नववर्षाच्या स्वागतानिमित्त भव्य कार्यक्रम तसेच “सन्मान पुरस्कार २०२६” सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवार, दिनांक १८ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता आयोजित करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम मध्य रेल्वे ऑफिसर्स क्लब हॉल, पोदार कॉलेज समोर, माटुंगा रेल्वे कॉलनी, माटुंगा (पूर्व), मुंबई येथे होणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. हिरेश मीना (DRM, मुंबई) आणि डॉ. शिवराज प्र. मानसपुरे (SRDCM, मुंबई) उपस्थित राहणार आहेत.
तसेच मान्यवर म्हणून
डॉ. स्वप्निल नीला (CPRO, मध्य रेल्वे)
श्री. अजय कुमार (DCM, मुंबई)
श्री. प्रदीप पी. कोरी (DCTI, मुंबई)
श्री. प्रकाश कन्नोजिया (SRDCM – Works)
श्री. पंकज कुमार (ACM/TC, मुंबई)
हे उपस्थित राहून मान्यवरांचा सन्मान करणार आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता स्वागताने होणार असून त्यानंतर हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रा, तिकीट चेकिंग स्टाफकडून नृत्य कार्यक्रम तसेच सन्मान पुरस्कार २०२६ वितरण सोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजक समस्त तिकीट चेकिंग परिवार, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.